agriculture news in Marathi, ashwgandha sowing not profitable, Maharashtra | Agrowon

करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

गडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत नंतर शेतकरी आणि कृषी विभागाची एका कंपनीने चांगलीच दमछाक केल्याचा धक्‍कादायक प्रकार दुर्गम आणि आदिवासीप्रवण गडचिरोली जिल्ह्यात समोर आला आहे. विशेष म्हणजे नागपुरातील या कंपनीने शेतकऱ्यांना चुकाऱ्यापोटी दिलेले चेकही पैशाअभावी बॅंकेत अनादरीत झाले. त्यामुळे औषधी वनस्पती आणि खरेदी संदर्भाने होणाऱ्या करारात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

गडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत नंतर शेतकरी आणि कृषी विभागाची एका कंपनीने चांगलीच दमछाक केल्याचा धक्‍कादायक प्रकार दुर्गम आणि आदिवासीप्रवण गडचिरोली जिल्ह्यात समोर आला आहे. विशेष म्हणजे नागपुरातील या कंपनीने शेतकऱ्यांना चुकाऱ्यापोटी दिलेले चेकही पैशाअभावी बॅंकेत अनादरीत झाले. त्यामुळे औषधी वनस्पती आणि खरेदी संदर्भाने होणाऱ्या करारात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

गडचिरोली हा भात उत्पादक जिल्हा या जिल्ह्यात व्यावसायिक पीकपध्दतीला चालना मिळावी, याकरिता कृषी विभागाने पुढाकार घेत औषधी वनस्पती लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. चामोर्शी आणि गडचिरोली तालुक्‍यांत अश्‍वगंधा लागवडीचे त्यानुसार ठरले. लागवडीपूर्वी खरेदीदारांचा शोध सुरू झाला. पुण्या-मुंबईतील खरेदीदार गडचिरोलीत काम करण्यास तयार नसल्याने कृषी विभागाच्या अडचणीत वाढ झाली. त्यामुळे त्यांनी विदर्भातीलच खरेदीदारांचा शोध सुरू केला. नागपुरातील एक कंपनी त्यानुसार तयार झाली. ९० एकर अश्‍वगंधा लागवड कंपनीच्या सहमतीनेच त्यानंतर झाली. १२० रुपये किलोचा दर कंपनीने देण्याचे मान्य केले. 

परंतु, अश्‍वगंधा उत्पादनानंतर मात्र कंपनीकडून खरेदीस टाळाटाळ करण्यात आली. कृषी विभागाकडून पाठपुरावा करण्यात आल्यानंतर कंपनी खरेदीला तयार झाली. खरेदी नंतर पुन्हा पैशासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात आली. शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी नंतर कृषी विभागाची चांगलीच दमछाक झाली. काही शेतकऱ्यांना कंपनीने दिलेले चेक अनादरीत झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. कंपनीकडून कसेबसे पैसे मिळवून दिल्यानंतर आता अशाप्रकारच्या कंपन्यांशी करार न करण्याची भूमिका कृषी विभागाने घेतली आहे.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...