agriculture news in marathi, Asia's First Goat milk processing unit starts in Belave, Sinnar, Nashik | Agrowon

आशियातील पहिल्या शेळी दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्रास प्रारंभ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 जून 2019

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
    महिलांची १०० % मालकी असलेला प्रकल्प
    एकूण १५०० महिला सभासद 
    दररोज शेळी दूध संकलन
    दूध प्रक्रियेसाठी स्वयंचलित यंत्रणा
    शेळी दुधापासून पहिल्यांदा चीज, पनीर यांची निर्मिती
    शेळीच्या लेंडीपासून खत व व्हर्मी कंपोस्ट निर्मिती व विक्री
    शेळी बोकड विक्रीसह दुग्धजन्य पदार्थाची विक्री व्यवस्था

नाशिक : सिन्नर तालुक्यातील बेलावे शिवारात युवा मित्र संस्था सिन्नर, सावित्रीबाई फुले प्रोड्यूसर कंपनी लि., एच. टी. पारेख फाउंडेशन मुंबई व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आशिया खंडातील पहिल्या शेळी दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया केंद्राचे उद्‍घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा याच्या हस्ते झाले.  

या वेळी उद्‍घाटन समारंभ व महिला मेळाव्याचे बुधवारी (ता. ५) आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विश्‍वनाथा बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री विनायकदादा पाटील, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, पशुसंवर्धन विभाग सहायक आयुक्त डॉ. सुधाकर शिरसाठ, उपायुक्त डॉ. संजय विसावे, पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद भणगे, मविप्रचे संचालक हेमंत वाजे, एच. टी. पारेख फाउंडेशनच्या स्विटी थॉमस, नाबार्ड विभागीय व्यवस्थापक अतुल वेदपाठक, सिन्नर वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णा भगत, ज्येष्ठ उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार उपस्थित होते. 

डॉ. विश्वनाथा म्हणाले, ‘‘सिन्नर तालुक्यात शेळी दूध संकलन व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग हा महिलांची मालकी असलेला आशिया खंडातील पहिला प्रकल्प आहे. या सुरू झालेल्या प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन विद्यापीठाच्या माध्यमातून केले जाईल, त्याबाबतचा सामंजस्य करार युवा मित्र संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामध्ये करण्यात आला आहे.’’
महिला मेळाव्यात भूषणा करंदीकर व सुनील पोटे यांनी महिलांच्या शंकांचे निरसन केले. श्री. पोटे यांनी कंपनीच्या शेअरधारकांना पशुवैद्यकीय सहकार्य व सेवा, प्रशिक्षण, चारा पिके बियाणे व इतर साधने पुरविण्याचे आश्वासन दिले. महिलांनी विमा, शेअर, तसेच शेळीपालनासंबंधी असलेले प्रश्न विचारले व त्यावर त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. युवा मित्र संस्थेच्या संचालिक मनीषा पोटे यांनी प्रास्ताविक केले.
 


इतर अॅग्रो विशेष
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...