Agriculture news in marathi To ask others with milk price Kisan Sabha agitation on Thursday | Page 2 ||| Agrowon

दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खासगी व सहकारी दूध संघांकडून मोठी लूटमार केली. लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने पाडले.

नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खासगी व सहकारी दूध संघांकडून मोठी लूटमार करण्यात आली. लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने पाडले. ग्राहकांसाठीचे विक्री दर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे.

दुधाला दर द्या यासह अन्य शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी किसान सभेने गुरुवारी (ता.१७) राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. किसान सभेच्या राज्य कौन्सिल बैठकीतील निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघर्ष समितीही त्यात सहभागी होणार आहे. 

किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन कौन्सिल बैठक झाली. बैठकीत दूधदराच्या प्रश्नावर सखोल चर्चा करून सरकार, खासगी दूध संघ चालकांकडून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आंदोलक व शेतकरी शक्य तिथे मोर्चे काढतील, निदर्शने करतील, दुग्धाभिषेक घालतील व निवेदने देतील, असे डॉ. अजित नवले यांनी सांगितले. 

या आहेत मागण्या 
लॉकडाउनच्या काळात ज्या खासगी व सहकारी दूध संघांनी, दूध खरेदीचे दर पाडले, त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्या प्रमाणात किती दर कमी देण्यात आले का? या बाबत सखोल चौकशी करा. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खासगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा. लुटलेले पैसै परत करा. 

लूटमार थांबवण्यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल, असा कायदा करा. दूध व्यवसायाला साखर धंद्याप्रमाणे रेव्हेन्यू शेअरिग व किमान हमी दर असे दुहेरी संरक्षण लागू करा. 
खरीप हंगामाच्या तयारीसाठी राज्यभर सर्वत्र पुरेसे खत, दर्जेदार बियाणे, शून्य व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी विमा योजनेची सक्षम व पारदर्शक अंमलबजावणी करा. 

थकलेली वीजबिले विनाशर्त माफ करा, आदिवासी शेतकऱ्यांना खावटी अनुदान सर्व श्रमिक आदिवासींना तातडीने द्या. 
वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वत्र चालना द्या, वृद्ध, अपंग, निराधार, विधवा, परित्यक्ता, यांना लॉकडाउन काळात अतिरिक्त एक हजार रुपये देण्याची घोषणेची अंमलबजावणी करा. योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान किमान तीन हजार रुपयांपर्यंत वाढवा. 
 


इतर बातम्या
‘रोहयो’तून विहिरी, शेतरस्त्यांची कामे...पांगरी, जि. सोलापूर ः ‘‘महाराष्ट्र ग्रामीण रोजगार...
सेंद्रिय परसबाग उभारून कुटुंबाची गरज...नाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
‘दुधना’च्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
परभणी जिल्ह्यात पीक नुकसानीच्या विमा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...