नायगावात ऊस शेतीसह १ एकरात शतावरीचा प्रयोग

नायगाव, जि. उस्मानाबाद ः परिसरातील शेतकरी बाजारपेठ पाहून वेगवेगळ्या पिकांची निवड करू लागले आहेत. कळंब तालुक्यातील नायगाव येथील व्यंकट धाराशीवकर यांनी ऊसशेती बरोबर १ एकरात शतावरीचा प्रयोग केला आहे.
Asparagus experiment in 1 acre with sugarcane cultivation in Naigaon
Asparagus experiment in 1 acre with sugarcane cultivation in Naigaon

नायगाव, जि. उस्मानाबाद  ः परिसरातील शेतकरी बाजारपेठ पाहून वेगवेगळ्या पिकांची निवड करू लागले आहेत. कळंब तालुक्यातील नायगाव येथील व्यंकट धाराशीवकर यांनी ऊसशेती बरोबर १ एकरात शतावरीचा प्रयोग केला आहे. त्यासाठी त्यांनी पुण्यातील एका कंपनीसोबत करार केला आहे. त्यांना हमीभाव मिळणार आहे. 

परिसरातील बहुतांश शेतकरी ऊस पिकाकडे वळले. त्यात स्थिरही झाले. पण,पुढे काळ व बाजारपेठ बदलू लागली. वेगवेगळ्या पिकांचे महत्त्व वाढले. औद्योगिकदृष्ट्याही महत्त्वाची पिके शेतकऱ्यांना खुणावू लागली. त्यातच माती, पाणी, दर या सर्वच बाबतीत ऊसशेती परवडेनाशी झाली आहे.

नायगाव येथील व्यंकट धाराशीवकर यांच्याकडे दोन कुपनलिका, एक विहर आहे. १५ एकर शेती आहे. त्यात ते ऊस घेतात. उसातून एकरी ७० टन उतारा, तर उत्पन्न सुमारे एक लाख चाळीस हाजार रुपये मिळायचे. मग त्यांनी उसाला पर्यायी पिकाचा शोध सुरू केला. त्यासाठी कृषी विषायासंदर्भातील पुस्तकांचे वाचन केले. त्या माध्यमातून त्यांना शतावरी पिकाबद्दल माहिती मिळाली. पुणे येथील एका कंपनीशी संपर्कही झाला. कंपनीविषयी सर्व खात्री, या पिकाचे अर्थकारण आदी सर्व माहिती घेतली. त्यानंतर कंपनीसोबत करार करून १ एकर लागवडही केली.

धाराशीवकर म्हणाले,‘‘ कंपनीसोबत करार केला आहे; त्यांनी प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. लेखी करार ही झाला आहे. प्रतिकिलो ५० रुपये असा हमीभाव ठरला आहे. रोपासाठी त्यांना एक लाख चाळीस हजार रुपय लागले. त्यांच्याकडे पांढरी व पिवळी शतावरी, असे दोन प्रकार आहेत. या पिकास आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते. पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. ठिबकद्वारे पाणी देण्यात येते. एकरी सुमारे दीड लाख रूपये उत्पादन खर्च आला. एकरी सुमारे २८०० झाडे आहेत. प्रतिझाड सुमारे सहा किलोपर्यंत उत्पन्न मिळते. शतावरी  ही औषधी वनस्पती आहे. त्यामुळे त्यास वैद्यकीयदृष्ट्या व औद्योगिकदृष्ट्या मागणी आहे.’’

अशी दिली खते

शतावरीसाठी रासायनिक खते न वापरता त्यांनी पुर्ण शेंद्रीय खताचा वापर केला आहे. शेन, गोमुत्र, दाळीचे पीठ, गुळ यांचे मिश्रन करुन त्यांनी प्रत्येक झाडाला ड्रिचिंग केली. धाराशीवकर यांना शतावरीच्या प्रत्येक झाडांपासन ६ किलोचे उत्पादन मिळण्याची आशा आहे.

कोणत्याही शेतकऱ्याने शतावरीचा प्रयोग करण्यापूर्वी लागवड, विक्री, मार्केटिंग, व्यापारी असा सर्वांगीण विचार करायला हावा. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्याशिवाय पुढे जाऊ नये. - व्यंकट धारीशीवकर, शेतकरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com