agriculture news in Marathi, assembly election planning depend on loksabha result, Maharshtra | Agrowon

लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची रणनीती
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून कोणाला ‘लीड’ मिळतेय यावरच विधानसभेची रणनीती ठरली जाणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नगर जिल्ह्यावरील विशेष लक्ष आणि जिल्ह्यामधील मातब्बर मंडळींनी लोकसभेच्या मतदानाआधी केलेली ‘गुप्त’ पेरणीमुळे आता विधानसभेची गणिते मांडण्यासाठी जाणकारांचे मतदारसंघनिहाय मताधिक्याकडे लक्ष लागले आहे. 

नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून कोणाला ‘लीड’ मिळतेय यावरच विधानसभेची रणनीती ठरली जाणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नगर जिल्ह्यावरील विशेष लक्ष आणि जिल्ह्यामधील मातब्बर मंडळींनी लोकसभेच्या मतदानाआधी केलेली ‘गुप्त’ पेरणीमुळे आता विधानसभेची गणिते मांडण्यासाठी जाणकारांचे मतदारसंघनिहाय मताधिक्याकडे लक्ष लागले आहे. 

दरम्यान दुष्काळाने होरपळ सुरू असलेल्या भागात एखाद्या नेत्याचा अपवाद वगळला तर, उमेदवारांसह त्यांचे ‘पाठीराखे’ मतदान पदरात पाडून घेतल्यापासून गायब झाल्याचे चित्र आहे. नगर जिल्ह्याचा राज्याच्या राजकारणात कायम प्रभाव राहिलेला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कॉँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील  यांनी भाजपत प्रवेश करून निवडणूक लढवली. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मुलासाठी भाजपचा प्रचार केला. त्यामुळे नगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुरती बदलली आहेत. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभेच्या निकालानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचाही भाजप प्रवेश होऊ घातला आहे. सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतील कॉँग्रेस विखेंनी जवळजवळ नामशेष केले आहे. साहजिकच विखेंचा राजकीय प्रभाव व उपद्रवमूल्य विचारात घेता लोकसभेच्या निकालानंतरच या मतदारसंघातील विधानसभेची गणिते अवलंबून आहेत. 

नगर शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार संग्राम जगताप स्वत:च लोकसभेचे कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत. जगताप लोकसभेत गेल्यास नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त होईल. ही अटकळ लक्षात घेऊन विविध पक्षांतील इच्छुकांनी जगताप यांच्या विजयासाठी नाइलाजाने `हातभार' लावल्याचे सांगण्यात येते. जगताप यांना लोकसभेत अपयश आल्यास साहजिकच त्यांना विधानसभेलाही सहानुभूती राहील. 

‘दुष्काळी’ पारावर आकडेमोड सुरूच
लोकसभा निवडणूक प्रचाराचा काळात छावण्यात नेत्यांचा माहोल सुरू होता. कळवळा दाखवत नेते छावण्यांत दाखल होत. जनावरांना चाराही खाऊ घालत होते. मते पदरात पाडून घेतली आणि उमेदवार, नेत्यांसह त्यांचे पाठीराखे गायब झाले आहेत. असे असले तरी दुष्काळी गावांतील पारावर ‘कोण निवडून येणार’ यावर चर्चा करून आकडेमोड सुरू आहे.

इतर ताज्या घडामोडी
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...