agriculture news in Marathi, Assembly elections announced , Maharashtra | Agrowon

विधानसभेचा बिगुल वाजला

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

मुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार, २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे, तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी गुरुवारी २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वीच राज्यात राजकीय फटाके फुटणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत शनिवारी (ता. २१) पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

मुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार, २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे, तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी गुरुवारी २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वीच राज्यात राजकीय फटाके फुटणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत शनिवारी (ता. २१) पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील २८८ आणि हरियाणातील ९० विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले. दोन्ही राज्यांत एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

महाराष्ट्रात एकूण ८.९४ कोटी मतदार आहेत. राज्यात १.८४ लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत विशेष सुरक्षा पथक तैनात करण्यात येणार आहेत.

तर राज्यभरातील सर्व पोलिंग बूथवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. दिव्यांग आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
मुंबई आणि सहकारी बँकांवर निवडणूक आयोगाची विशेष नजर असणार आहे. तसेच, महाराष्ट्रामध्ये दोन विशेष अधिकारी खर्च मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. उमेदवारांना प्रत्येकी २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. त्याचसोबत उमेदवारांना तीस दिवसांचा हिशेब निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे.

प्रचारकाळात सोशल मीडिया आणि फेसबुकवर आयोगाचे संपूर्णपणे नियंत्रण असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येत्या सोमवारी एक केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. प्रचारामध्ये प्लॅस्टिकच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरणस्नेही सामग्रीचा वापर करणे उमेदवारांना बंधनकारक करण्यात आले आहे.

२०१४ मध्ये विभागनिहाय कोणाला किती जागा मिळाल्या होत्या?
पश्चिम महाराष्ट्र (७०)ः
भाजप २४, शिवसेना १३, काँग्रेस १०, राष्ट्रवादी १९, इतर ०४
विदर्भ (६२)ः भाजप ४४, शिवसेना ०४, काँग्रेस १०, राष्ट्रवादी ०१, इतर ०३
मराठवाडा (४६)ः भाजप १५, शिवसेना ११, काँग्रेस ०९, राष्ट्रवादी ०८, इतर ०३
कोकण (३९)ः भाजप १०, शिवसेना १४, काँग्रेस ०१, राष्ट्रवादी ०८, इतर ०६
मुंबई (३६)ः भाजप १५, शिवसेना १४, काँग्रेस ०५, राष्ट्रवादी ००, इतर ०२
उत्तर महाराष्ट्र (३५)ः भाजप १४, शिवसेना ०७, काँग्रेस ०७, राष्ट्रवादी ०५, इतर ०२
एकूण (२८८)ः भाजप १२२, शिवसेना ६३, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४१, इतर २०

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल-
 

भाजप १२२
    शिवसेना  ६३
काँग्रेस ४२
राष्ट्रवादी   ४१
बविआ   ०३
शेकाप   ०३
एमआयएम   ०२
वंचित/भारिप   ०१
माकप   ०१
मनसे    ०१
रासप  ०१
सपा  ०१
अपक्ष  ०७
एकूण   २८८

 


इतर बातम्या
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ...
महिलांनी मालक बनले पाहिजे ः राज्यपालमुंबई ः महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी...मुंबई ः दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी...
ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न का वाढत नाही...पुणे: देशात ५० टक्के रोजगार हा शेतीशी निगडित व...
नागपूर : थंडीची तीव्रता वाढली; अंडी...नागपूर ः थंडीच्या दिवसांत मागणी वाढत अंड्यांचे...
निफाडला २.४ अंश तापमान; राज्य थंडीने...पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या...
शेतात नवे प्रयोग करणारे शेतकरी आमचे...मुंबई ः प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग...
चिखलदऱ्याच्या स्ट्राॅबेरीला हवाय...अमरावती ः लागवड खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळवून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ लाख टन...औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद साखर सहसंचालक...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...
अकोल्यात भारिप, वाशीममध्ये...अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष...
पुणे जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ लसीकरण...पुणे : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या...
पत्नीच्या नावे कामकाजासाठी येणाऱ्या...बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना...
पाणी, शेती विकासासह समाजकारणाला...नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे...
पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकट्याचा...पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम जिरायत भागात...