Agriculture news in marathi For Assembly by-elections Curfew relaxed in Pandharpur | Agrowon

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात संचारबंदी शिथिल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, जारी करण्यात आलेली संचारबंदी १६ एप्रिल २०२१ रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते १८ एप्रिल २०२१ रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यात जारी करण्यात आलेली संचारबंदी १६ एप्रिल २०२१ रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते १८ एप्रिल २०२१ रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र जमावबंदीचे आदेश लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान आहे. त्या अनुषंगाने हा आदेश जारी केला आहे. या आदेशात नमूद केले आहे की, तत्पूर्वी शनिवारी (ता.१०) आणि रविवारी (ता. ११) कोणत्याही वैध कारणाशिवाय किंवा परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास बंदी आहे.

तथापि या आदेशानुसार निवडणूक प्रचार आणि अनुषांगिक कामकाजास्तव दहा एप्रिल रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते अकरा एप्रिलच्या रात्री आठ वाजेपर्यंत सदरची संचारबंदी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रासाठी शिथिल करण्यात येत आहे. मात्र जमावबंदीचे मनाई आदेश लागू राहतील.

प्रचारसभांना नियम-अटींवर परवानगी
पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा, रॅली यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी द्यावी. मात्र त्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी असल्यास उपलब्ध जागेच्या पन्नास टक्के परंतु २०० पेक्षा जास्त व्यक्ती नसतील या मर्यादेत परवानगी द्यावी. असे कार्यक्रम खुल्या जागेत असल्यास जागेच्या पन्नास टक्के क्षमतेपर्यंत परवानगी द्यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...