कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
अॅग्रो विशेष
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत विरोधकांचा सभात्याग
नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे जोरदार पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत कामकाम रोखले. यामुळे दोन वेळा कामकाज १०-१० मिनिटांसाठी तहकूब करावे लागेल. सरकार बधत नाही, असे बघितल्यानंतर अखेर विरोधकांनी सभात्याग केला.
दरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विधानपरिषदेतही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या मुळे परिषदेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

कामकाज प्रारंभ होताच दूधदरप्रश्नी विधानसभेत विरोधीपक्षांची स्थगन नोटीस दिली. दुधाला ३० रु.दर जाहीर करा. अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
तर, भुकटीचे अनुदान संघांना, शेतकर्यांना काय, असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी शासनाने सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चेतून सर्वमान्य तोडगा काढावा, असे आवाहन केले. चंद्रदीप नरके यांनी ५ रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली.
आक्रमक विरोधांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केल्यानंतर १० मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. यानंतर कामकाम सुरु झाल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिल्याने पुन्हा एकदा सभागृह १० मिनिटांकरिता तहकूब करावे लागले. यानंतरही सरकार बधत नाही असे लक्षात येता विरोधकांनी सभात्याग केला.
सरकार हे चालू देणार नाही...
सहकारी संघांनी संकलन बंद केले, शेतकर्यांना वेठीस धरले जातेय, हे शेतकरी विरोधी आंदोलन आहे, सरकार हे चालू देणार नाही
- मंत्री चंद्रकांतदादा पाटील
...आणि मुश्रीफ यांनी संधी साधली!
विधानसभेचे सोमवारी सकाळी कामकाज सुरू झाले असता विरोधी बाकावरील सदस्यांनी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी विषयी बोलायला सुरवात केली. त्यातच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तरे कामकाज पुकारले. मात्र विरोधी सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. या दरम्यान कामकाज दोनदा तहकूब केले. तरीही दुधाचा प्रश्न सुरूच होता. अध्यक्ष बागडे यांनी हसन मुश्रीफ यांना आपला पहिला प्रश्न आहे. आपण प्रश्न विचारा असे आव्हान केले. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यतील शिरगाव ते आमजाई व्हरवडे या रासत्यचया दुरुस्तीचा प्रश्न होता. मुश्रीफ यांनी माईकचा ताबा घेतला. इतर सदस्यांना वाटले की मुश्रीफ आता विरोधी बाकावरील दूध उत्पादक शेतकरी प्रश्न बोथट करतात की काय. मात्र मुश्रीफ यांनी अध्यक्ष यांनी दिलेली संधी घेतली. मात्र त्यांनी कावा साधत त्या लिखित प्रश्नवर न बोलता थेट कोल्हपुर जिल्ह्यातील दुधाच्या प्रश्नवर बोलण्यास सुरवात केली आणि संधी साधली...
- 1 of 434
- ››