Agriculture news in marathi By the Association of Veterinary Practitioners The strike should be called off | Agrowon

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद आंदोलन मागे घ्यावे 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने १६ जुलैपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने १६ जुलैपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने केले आहे. अन्यथा प्रशासकीय कारवाईचा इशारा दिला आहे. 

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेला १९ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी त्यांच्या दहा मागण्या शासनस्तरावरच्या असल्याचे कळविले आहे. जिल्हा परिषद स्तरावरची फक्त पदोन्नतीबाबतची एक मागणी असून, ती पूर्ण करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या राजपत्रात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेला २२ सेवा देण्याबाबत आदेशित केले आहे. या सेवा देण्यासाठी त्यांना पगार देण्यात येतो. सध्या पावसाळ्याच्या दिवसात जनावरांना लसीकरण व इतर सेवा देणे आवश्यक असताना हे कामबंद आंदोलन सयुक्तिक व नियमाला धरून नाही. तरी तत्काळ कामबंद आंदोलन मागे घेऊन गोपालकांच्या पशुधनास सेवा पुरविण्यात यावी. अन्यथा आपणावर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना कळविले आहे. 

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने पुकारलेला संप शासकीय नियमांना बसणारा नाही. ज्या सेवा देण्याकरिता त्यांची नेमणूक करण्यात आली आहे, ती त्यांनी शेतकऱ्यांच्या पशुधनास पुरवून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी व कामबंद आंदोलन मागे घ्यावे अन्यथा नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांनी म्हटले आहे. 
संघटनेच्या मागण्या शासनस्तरावरील असल्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन मागे घेऊन गोपालकांना आपल्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात.

सध्या पावसाळ्यात जनावरांना तत्काळ लसीकरण व प्रथमोपचार पुरविणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन आपला संप मागे घ्यावा. अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे यांनी कळविले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...