agriculture news in marathi, assurance of excess sugar export | Page 2 ||| Agrowon

अतिरिक्त साखर निर्यातीचे आश्‍वासन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जानेवारी 2018

कोल्हापूर : साखर निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देऊन त्वरित अतिरिक्त साखरेची निर्यात करण्यात येईल, असे आश्‍वासन व्यापारी व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. याबरोबरच पाकिस्तानातून साखर आयात करण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचे आश्‍वासन प्रभू यांनी दिले. शेट्टी यांच्यासह जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी प्रभू यांची दिल्ली येथे भेट घेऊन साखर उद्योगाच्या समस्या मांडल्या.

कोल्हापूर : साखर निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देऊन त्वरित अतिरिक्त साखरेची निर्यात करण्यात येईल, असे आश्‍वासन व्यापारी व वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. याबरोबरच पाकिस्तानातून साखर आयात करण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचे आश्‍वासन प्रभू यांनी दिले. शेट्टी यांच्यासह जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी प्रभू यांची दिल्ली येथे भेट घेऊन साखर उद्योगाच्या समस्या मांडल्या.

"साखरेच्या दरात प्रचंड घसरण सुरू आहे. सट्टाबाजारातून तसेच काही व्यापाऱ्यांकडून साखरेचे दर पाडले जात आहेत. यामुळे ऊसउत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना एफआरपीही मिळणे अवघड झाले आहे. एकूणच, देशातील साखर उद्योग आर्थिक आरिष्टात सापडला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्राने त्वरित 40 लाख टन बफर स्टॉक करण्याचे आदेश काढावेत, साखर निर्यातीला अनुदान द्यावे,'' अशी मागणी श्री. शेट्टी यांनी केली.

यावर प्रभू यांनी यातून योग्य तो मार्ग तातडीने काढण्याचे आश्‍वासन दिले. या संदर्भात लवकरच एक धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, मागील सरकारच्या काळात ज्याप्रमाणे निर्यात साखरेला अनुदान दिले जात होते, त्याचप्रमाणे ते पुन्हा सुरू केले जाईल, असे प्रभू यांनी शेट्टी यांच्याशी बोलताना सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...