राज्यात लवकरच अटल आनंदवन योजना ःमुनगंटीवार

राज्यात लवकरच अटल आनंदवन योजना
राज्यात लवकरच अटल आनंदवन योजना

नाशिक : पर्यावरण रक्षणासाठी वनसंवर्धन आवश्यक असून, त्यासाठी ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला वन आंदोलन आणि वृक्ष सत्याग्रहाचे स्वरूप लोकसहभागातून येणे आवश्यक आहे. जपानमधील मियावाकी जंगलाच्या धर्तीवर प्राणवायूची शाश्वत ठिकाणे निर्माण करण्यासाठी नगरपालिका, महापालिका यांच्या धर्तीवर अटल आनंदवन योजना आणली जाणार आहे. एक एकरात १० ते १२ हजार झाडे लावून ती जगवून या माध्यमातून १३ टक्के वन आच्छादित क्षेत्र वाढविणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.   म. वि. प्र. संस्थेच्या वाणिज्य, व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयात ३३ कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात आयोजित विभागीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त राजाराम माने, महापौर रंजना भानसी, खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक टी. के. चौबे, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, ए. के. कळसकर, पोपटराव पवार आदी उपस्थित होते. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षसंवर्धनासाठी पुढील दहा वर्षांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बिजारोपण होण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात यावा. रानमळा पद्धत, कन्या वनसमृद्धी योजना हे उपक्रम याच प्रयत्नांचा भाग असून, त्याबाबत जनतेला अधिकाधिक माहिती देण्यात यावी. वन विभागातर्फे १२ हजार ६६५ गावांत संयुक्त वन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीची सांगड आर्थिक आणि सामाजिक विकासाशी घालून त्याला लोकचळवळीचे रूप देण्याचा प्रयत्न असून, जनतेने यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन वनमंत्र्यांनी केले. विभागीय आयुक्त माने यांनी ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत विभागातील पूर्वतयारीची माहिती दिली. नाशिक विभागात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ५ कोटी ८२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ६ कोटी ८५ रोपे उपलब्ध आहेत. ५ कोटी ४ लक्ष खड्डे खोदण्यात आले आहेत. हरितसेनेअंतर्गत ७ लाख ९५ हजार नोंदणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. या वेळी पोपटराव पवार यांनी मधमाश्‍या आकर्षित करणाऱ्या आणि पक्ष्यांच्या अधिवासासाठी उपयुक्त प्रजातीची झाडे लावण्याचे आवाहन केले.

नाशिक विभागातील वृक्ष लागवडीची आखणी 

  •  धुळे ‍जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वन विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड 
  •  जळगाव जिल्ह्यात रोटरी क्लब आणि जैन इरिगेशनच्या माध्यमातून त्रिपक्षीय कराराद्वारे वृक्ष लागवड 
  •  नंदुरबार जिल्ह्यातील कोठली खुर्द गावात सघन वृक्ष लागवड; त्यासाठी २२ गावांत स्वयंसेवी संस्थांची मदत
  •  नाशिक जिल्ह्यात देवराईच्या माध्यमातून वृक्षारोपणाला चांगला प्रतिसाद 
  •  अहमदनगर जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी साखर कारखान्यांची मदत
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com