सहकारी संस्थांसाठी प्रक्रिया, मूल्यवर्धनासाठी ७५ टक्के अनुदान

सहकारी संस्थांसाठी प्रक्रिया, मूल्यवर्धनासाठी ७५ टक्के अनुदान
सहकारी संस्थांसाठी प्रक्रिया, मूल्यवर्धनासाठी ७५ टक्के अनुदान

पुणे : शेतीमाल मूल्यवर्धन आणि प्रक्रिया व्यवसाय उभारणीतून सहकारी संस्थांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अटल अर्थसाहाय्य योजनेला शासनाने मान्यता दिली आहे. ३४ जिल्ह्यांतील ३५५ तालुक्यांसाठी ४९० कोटींची तरतूद करण्यात आली असून, एका प्रकल्पासाठी ४० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे यांनी दिली.  आकरे म्हणाले, ‘‘शेतीमालाच्या मूल्यवर्धन आणि प्रक्रियेतून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त दर देण्यासाठी सहकारी संस्थांना व्यावसायिकतेला चालना देण्यात येणार आहे. यासाठी सहकारी संस्थांना ४० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी सहकारी संस्थेची १२.५० टक्के गुंतवणूक आणि सहकार विकास महामंडळाकडून १२.५० टक्के कर्ज देण्यात येणार आहे. तर प्रकल्प किमतीच्या ७५ टक्के अनुदान सरकारकडून देण्यात येणार आहे. या योजनेतील प्रकल्प निवडीसाठी जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आणि सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यासाठी गेल्या पाच वर्षातील नोंदणी केलेली आणि लेखापरीक्षणास पात्र असलेली कोणतीही सहकारी संस्था पात्र असणार आहे.   योजनेची उद्दिष्ट्ये 

  • शेतीमालावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे 
  • शेतकरी ते ग्राहकांमधील मूल्य साखळी कमी करणे 
  • जागतिक बाजारपेठेशी सुसंगत प्रक्रिया उद्योग सुरू करणे 
  • सुशिक्षित तरुणांना सहकारी संस्थांद्वारे रोजगार उपलब्ध करणे 
  • शेतीमाल निर्यातीसाठीसाठी प्रोत्साहन
  • शुद्ध पाणीपुरवठा यंत्रणा अर्थसाहाय्य
  • कृषी निविष्ठा पुरवठा उद्योगांना प्रोत्साहन देणे
  • शेतीमाल साठवणूक उद्योग उभारणीसाठी मदत करणे 
  • शेतीमाल ब्रॅंडिंग, पॅकेजिंग, लेबलिंगला प्रोत्साहन देणे 
  • कापडी, ज्यूट बॅग निर्मिती 
  • ॲग्री बिझनेस स्टार्टअप प्रशिक्षण कार्यक्रम  या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींसाठी सहकार विकास महामंडळाच्या वतीने पाच दिवसांचा ॲग्री बिझनेस स्टार्टअप प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध उद्योग संधी, प्रकल्प अहवाल, निर्यात, परवाना आदी विविध अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.  - मिलिंद आकरे, कार्यकारी संचालक सहकार विकास महामंडळ

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com