आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदार

आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदार
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदार

सांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने आले. त्यातच तालुक्यात पावसाची कृपादृष्टी झाल्याने आटपाडी तालुक्यातील सात तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. पाच तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय अनेक ओढ्यानांही पाणी सोडले आहे. तालुक्यातील रब्बी हंगामासाठी हा पाऊस पोषक ठरेल. द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

टेंभूच्या पाण्यामुळे बऱ्याच कालखंडानंतर आटपाडी तालुका ''पाणीदार'' झाला आहे. यावर्षी वरुणराजाने तालुक्यावर चांगलीच मेहरबानी केली. आतापर्यंत चारशे मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी तो सरासरी ६० मिलिमीटर झाला होता. यावर्षी त्याने सरासरीच्या ११० टक्के हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई मिटली आहे. 

टेंभूचे पाणी तालुकाभर फिरले आहे. १९ ऑक्‍टोबरला टेंभूचे पंप सुरू केले. कालव्यावरील कामे सुरू असल्यामुळे सारे पाणी आटपाडी तलावात सोडले. ३०० दशलक्ष घनफूट क्षमतेचा आटपाडी तलाव अवघ्या पाच दिवसांत भरून २० दिवस शुक ओढ्यातून पाणी खाली सोडले.  

कचरेवस्ती, अर्जुनवाडी, घाणंद, चिंचाळे, मिटकी आणि कामत हे सात तलाव पूर्ण भरले आहेत. सध्या निंबवडे, माळेवस्ती, दिघंची, बनपुरी, शेटफळे तलावात पाणी सोडले आहे. ते भरण्याच्या मार्गावर आहेत. बनपुरीतून मेळमेळी तलावातही पाणी सोडले आहे. या आठवड्यात हे तलाव भरले जातील. 

आटपाडीचा शुक ओढा, माणगंगा नदी, करगणी- शेटफळेचा बेलवण ओढ्यातूनही पाणी सोडले आहे. अनेक बंधारेही भरले आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. बुध्दीहाळ तलावात शेटफळे ओढ्यातून पाणी सोडले असून किमान १५ दिवस तरी हे पाणी चालू राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com