नगरला ‘आत्मा’चे प्रगतिशील शेतकरी पुरस्कार रखडले 

शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अन्य शेतकऱ्यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत ‘जिल्हा शेतकरी पुरस्कार’ देऊन शेतकऱ्यांचा गौरव केला जातो.
agriculture department
agriculture department

नगर ः शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अन्य शेतकऱ्यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत ‘जिल्हा शेतकरी पुरस्कार’ देऊन शेतकऱ्यांचा गौरव केला जातो. नगर येथील प्रकल्प संचालकांच्या दुर्लक्षामुळे ‘आत्मा’ अंतर्गत देण्यात येणाऱ्या शेतकरी पुरस्काराचे दोन वर्षांपासून वितरणच झाले नाही. त्यामुळे कृषी विभागाकडून नगर जिल्ह्यात प्रगतिशील शेतकरीही दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.  शेतीत वेगवेगळे प्रयोग राबून अनेक शेतकरी जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत. शेतकरी गट, शेतकरी कंपनीच्या माध्यमातूनही अनेक शेतकऱ्यांनी शेतीत आगळेवेगळे काम सुरू ठेवले आहे. अशा शेतकऱ्‍यांचा गौरव करण्यासाठी कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत जिल्हा स्तरावर शेतकरी पुरस्कार देऊन गौरव केला जातो. प्रत्येक तालुक्यातून एका शेतकऱ्यांची यासाठी निवड केली जाते. दहा हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे स्वरूप असलेले हे पुरस्कार जिल्हास्तरावर महत्त्वाचे मानले जातात. तालुका पातळीवरून प्रस्ताव मागवून पुरस्कारप्राप्त शेतकरी निवडले जात असले तरी नगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून हे पुरस्कारच दिले गेले नाहीत. त्याबाबत कृषी विभागातून फारशी माहिती दिली जात नाही.  यंदाही प्रस्ताव मागवले  मिळालेल्या माहितीनुसार तालुका पातळीवरून प्रस्ताव आले असले तरी प्रकल्प संचालकांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. यंदाही प्रस्ताव मागवले आहेत. प्रस्ताव देणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र पुरस्कार कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com