वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण वाढतेय पाच टक्क्यांनी!

पठारी प्रदेशात वातावरणातील धुलिकणांची पातळी दरवर्षी सुमारे ५ टक्क्याने वाढत असल्याचे उतह विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे.
Atmospheric dust levels are rising in the Great Plains
Atmospheric dust levels are rising in the Great Plains

पठारी प्रदेशात वातावरणातील धुलिकणांची पातळी दरवर्षी सुमारे ५ टक्क्याने वाढत असल्याचे उतह विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. पठारी प्रदेशात वातावरणातील धुलिकणांची पातळी दरवर्षी सुमारे ५ टक्क्याने वाढत असल्याचे उतह विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. हा धुलिकणांचा वाढता कल हा वाढत्या शेतीमध्येही आणि हंगामी पिकांच्या साखळीमध्येही समांतरपणे चढता राहिलेला आहे. अशा प्रकारे पठारी प्रदेश कोरडे बनत गेल्यास, वातावरण बदलाच्या शक्यता गृहित धरल्यास पुन्हा १९३० मधील मध्यपश्चिमेतील धुळीच्या वातावरणाप्रमाणे स्थिती निर्माण होऊ शकते. पहिले धुळीचे साम्राज्य

  • १९३० मध्ये मेक्सिको ते कॅनडा येथील पठारी प्रदेशामध्ये (ग्रेट प्लेन्स) दुष्काळाचे सावट होते. त्या आधी १९२० पासूनच्या दशकांमध्ये मोठमोठ्या यंत्रांच्या साह्याने गवताळ व कुरणाखालील जमीन ही शेतीमध्ये बदलण्यासाठी जमिनीची उलथापालथ करण्यात आली. मात्र, पुढील दुष्काळाच्या स्थितीमध्ये पिके तग धरू शकली नाहीत. त्यानंतर वाऱ्यामुळे वातावरणातील धुळीच्या कणांचे प्रमाण वेगाने वाढले. 
  • धुळींची वादळे वाढली. अगदी लोकांना श्वास घेण्यातही अडचणी येऊ लागल्या. याबरोबर मातीतील अन्नद्रव्येही वाऱ्यासोबत उडून गेल्याने पिकांचे उत्पादन अपेक्षेइतके आले नाही. ते रोखण्यासाठी पुन्हा या जमिनीवर गवताची वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पुढे पाऊस झाल्यानंतर हे धुळीचे प्रमाण कमी झाले. मात्र, जमिनीचे झालेले नुकसान पूर्णपणे भरून आले नाही. 
  • २००० वर्षाच्या आसपास जैवइंधन पिकाच्या लागवडीसाठी पुन्हा एकदा पडीक जमिनीवर मशागतीसह कामे सुरू झाले. त्यातून २००६ ते २०११ या पाच वर्षामध्ये पाच मध्य पश्चिमेतील राज्यांमधील  ५.३० लाख हेक्टर गवताळ जमिनीचे रूपांतर शेतीमध्ये करण्यात आले. नेमके त्याच काळात या पठारी प्रदेशामध्ये दीर्घ व अधिक तीव्र दुष्काळाची स्थिती उद्भवली. येथील दुष्काळाबाबतची अनिश्चितता आणि संभाव्या उष्ण, कोरड्या वातावरणाची स्थिती लक्षात घेता या प्रांतामध्ये वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असा इशारा उतह विद्यापीठातील संशोधिका लॅम्बर्ट आणि सहयोगी प्रोफेसर गॅनेट हॅलर यांनी दिला आहे. 
  • संशोधिका लॅम्बर्ट यांनी सांगितले, की आपण जमिनीच्या पृष्ठभागामध्ये विनाकारण बदल करत चाललो आहोत. वास्तविक ज्या प्रमाणे खनिज इंधनाचा वापर आवश्यकतेएवढाच करतो, त्याच प्रमाणे जमिनीमधील बदल अत्यावश्यक असेल तरच केले पाहिजेत. उदा. शेतीतील अनेक क्रिया या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, त्यातही गरजेनुसार योग्य ते बदल केले पाहिजेत. 
  • असा झाला अभ्यास

  • उतह विद्यापीठातील अँडी लॅम्बर्ट, हॅलर आणि त्यांच्या कोलोरॅडो बाऊल्डर विद्यापीठ आणि कोलोरॅडो राज्य विद्यापीठातील सहकाऱ्यांसह  वातावरणातील धुलिकणांच्या प्रमाणाचे मापन करण्यात आले. गेल्या दशकापासून त्यात झालेले फरक मिळवण्यात आले. विविध संस्थांच्या सहकार्याने जमिनीलगत आणि उंचावरील वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण विविध उपकरणाच्या साह्याने मोजण्यात आले. त्यामुळे सूर्यप्रकाश येण्यावर होणारा परिणाम तपासण्यात आला.
  • १९८८ पासून २०१८ पर्यंतची माहिती जमा करण्यात आली. त्यावरून पठारी प्रदेशामध्ये दरवर्षी पाच टक्के या प्रमाणे वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण वाढत गेल्याचे दिसून आले. या अभ्यासाचे निष्कर्ष जियोफिजिकल रिसर्च लेटर्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 
  • पिकांच्या कालावधीशी संबंध वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण आणि पिकांचा कालावधी यामध्ये संशोधकांना संबंध असल्याचे आढळले आहे. आयोवा राज्यामध्ये सोयाबीन हे वाढणारे मुख्य पीक असून, लागवडीच्या आणि काढणीच्या काळामध्ये अनुक्रमे विशेषतः जून आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये धुळीचे प्रमाण वाढते. दक्षिणेतील पठारी प्रदेशामध्ये मका हे मुख्य पीक असून, या पिकाच्या लागवड आणि काढणीच्या हंगामामध्ये मार्च आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये धुलीकणांचे प्रमाण वाढते.   धुलिकणांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ...

  • लॅम्बर्ट यांनी सांगितले, की मध्य पश्चिमेतील आणि ग्रेट प्लेन्स भागातील धुळीच्या कलांचा अभ्यास केल्यास धुलिकणांच्या वाढीचा दुसरा टप्पा लवकरच येणार असल्याची भीती आहे. ज्या प्रमाणे पिकांचे क्षेत्र वाढत चालले आहे, वातावरणातील बदलांचे प्रमाण वाढत चालल्याने  दुष्काळाचा धोकाही वाढत आहे. हे पाहता त्याची शक्यता वर्तवता येते.
  • हॅलर म्हणाल्या की शेतकरी समुदायाची जमिनीच्या वापर आणि हालचालीसंदर्भातील गरज लक्षात घेणे आवश्यक आहे. वातावरणातील बदलाला सामोरे जाताना विविध प्रक्रियेतून उद्भवणाऱ्या धुलिकणाची समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मातीचा व अन्नद्रव्यांचा ऱ्हास ही शेतकरी समुदायासाठीही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ते प्रमाण कमी करण्यासाठी शेतकरीही नक्कीच प्रयत्न करतील. स्वच्छ भविष्यासाठी आपल्याला सर्वांना मार्ग काढावा लागणार आहे. 
  •  ं

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com