बीडसाठी नगरमधून पाणी आणण्याचे प्रयत्न

बीडसाठी नगरमधून पाणी आणण्याचे प्रयत्न
बीडसाठी नगरमधून पाणी आणण्याचे प्रयत्न

बीड : आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यांत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे लगतच्या नगर जिल्ह्यातील जलस्स्राेतून याठिकाणी पाणी उपलब्ध करण्यासाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. 

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. २६) दुष्काळी आढावा बैठक झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, उपजिल्हाधिकारी हरिच्छंद्र गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. 

गोयल म्हणाले, ''दुष्काळी परिस्थितीमध्ये राज्यात सर्वात जास्त अडचणींचा सामना बीड जिल्ह्याला होत आहे. याठिकाणी पाणी पुरविण्यासाठी सर्वंकष उपाययोजना कराव्यात.''

दरम्यान, केज, अंबाजोगाई, धारूर, परळी, आष्टी, शिरूर, गेवराई, माजलगाव, वडवणी येथील गटविकास अधिकाऱ्यांनी व मुख्याधिकाऱ्यांनी नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाची माहिती दिली. 

कुकडी, जायकवाडीतून पाणी? 

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकर, विंधन विहिरींचे अधिगृहण केले आहे. त्याचबरोबर मेहकरी, सीना, माजलगाव येथील बंधाऱ्यांमध्ये कुकडी, जायकवाडी येथून पाणी मिळण्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत मंजुरी घेतली जात असल्याची माहिती येडगे यांनी दिली.

निम्मे वीज देयक भरून योजना सुरू करा

जनावरांसाठीदेखील पाणी उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, असे गोयल यांनी सांगितले. पाणी सुरू असणाऱ्या योजनांसाठी वीज कायमस्वरूपी खंडित असल्यास निम्मे वीजबिल भरून तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, अधिग्रहनाच्या खर्च रकमा लगेच अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com