कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईचा दूध पुरवठा रोखून सरकारची कोंडी करण्यासाठी गुरुवारी (ता. १७) कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकूळ दूध) गोकूळ शिरगाव (ता. करवीर) येथे सकल मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करीत कोल्हापूरहून मुंबईला जाणारा दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Attempt to stop Gokul's milk in Kolhapur
Attempt to stop Gokul's milk in Kolhapur

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईचा दूध पुरवठा रोखून सरकारची कोंडी करण्यासाठी गुरुवारी (ता. १७) कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकूळ दूध) गोकूळ शिरगाव (ता. करवीर) येथे सकल मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करीत कोल्हापूरहून मुंबईला जाणारा दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

आंदोलकांच्या वतीने पोलिस भरती आणि इतर सर्व भरती आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने ठोस भूमिका मांडण्यासाठी सोमवार पर्यंतचा अल्टीमेट सरकारला यावेळी देण्यात आला. सरकारने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावे, अन्यथा सोमवारपासून वर्षा बंगला, मातोश्री बंगला यासह सर्वच मुंबईकरांना काळा चहा पिण्याची वेळ येईल.

 कोल्हापूर व इतर सर्व ठिकाणांवरून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखून मुंबईची रसद तोडून गनिमीकाव्याने आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करीत ताब्यात घेतले. पोलिस बंदोबस्तात गोकूळ दूध संघाचे कामकाज पूर्ववत झाले असून दूध पुरवठा  सुरू झाला आहे.

यावेळी गोकूळ दूध संघ, गोकूळ शिरगाव, पुणे-बेंगलोर  राष्ट्रीय महामार्ग अशा अनेक ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने जमावबंदी आदेशाचे पालन करीत शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केले आहे. तसेच राज्यात ही वििवध ठिकाणी मराठा आंदोलकांनी आंदोलने, निदर्शने केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com