सांगलीत दूध संकलनाचा प्रयत्न `स्वाभिमानी`ने हाणून पाडला

सांगलीत दूध संकलनाचा प्रयत्न `स्वाभिमानी`ने हाणून पाडला
सांगलीत दूध संकलनाचा प्रयत्न `स्वाभिमानी`ने हाणून पाडला

सांगली ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशी सुरू होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन केंद्रात येऊन दूध जमा करत होते. संकलन केंद्रात जमा झालेले दूध प्राथमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालयात जाऊन वाटप करत होते. जिल्ह्यातील तेरा लाख लिटर दूध संकलन बंद राहिले आहे. भिलवडी परिसरात काही व्यावसायिकांनी दूध संकलनाचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.

जिल्ह्यात दूध संघ, संस्था व उत्पादक आंदोलनात सहभागी झाल्याने जिल्ह्यातील १३ लाख ४० हजार लिटर दूध संकलन दुसऱ्या दिवशीही बंद राहिले. परिणामी जिल्ह्यात दुधाचाही महापूर आला. गावोगावी नद्यांना, ग्रामदेवता, पुतळ्यांना अभिषेक, शाळा-वसतिगृहांमध्ये मोफत दुधाचे वाटप करून शेतकऱ्यांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. आटपाडी तालुक्‍यातील झरे, आवळाई, आटपाडी, नेलकरंजी आदी भागात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध नोंदविला. उद्यापासून दुधाचे संकलन संघातर्फे सुरू राहणार असल्याने खऱ्या अर्थाने आंदोलन पेटणार, अशी चिन्हे आहेत. आंदोलनाचा भडका उडू नये म्हणून प्रशासन, पोलिस दलाने दक्षता घेतली आहे.

गनिमी काव्यावर पोलिसांची नजर उत्पादकांनी दूध संस्थेला दूधच घालू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. त्यानुसार खासगी व्यवसायिकांनी मंगळवारी सर्व संघांनी दूध संकलन बंद ठेवले. मात्र, बुधवारपासून (ता. १८) बहुतांश दूध संघ संकलन करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे पहिल्यांदा दूध संस्थेलाच दुधाचा पुरवठा होणार नाही, याची खबरदारी संघटनेचे कार्यकर्ते घेणार आहेत. त्यातूनही संस्थांना दूध गेले तर ते संस्थेतून संघाला जाणार नाही, यासाठी प्रयत्न होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com