Agriculture news in Marathi Attempts to restore public life in Buldana district | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनबाबत नव्याने आदेश लागू केल्यानंतर आता सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनबाबत नव्याने आदेश लागू केल्यानंतर आता सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकाने उघडण्याबाबत आदेश दिल्यानंतर शुक्रवार (ता. २२) पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. जिल्ह्यात एसटी बस सेवा सुरू झाली तर ठिकठिकाणी विविध प्रकारची दुकाने उघडलेली दिसून आली. हॅण्डवॉश, सॅनिटायझर, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर पाळणे, या अटींसह ही सवलत देण्यात आली.

या सेवा झाल्या सुरू
जीवनावश्यक वस्तू विक्री ठिकाणे धान्य व किराणा, बेकरी, फळे व भाजीपाला, कृषी संबंधित सर्व दुकाने, दुधाची दुकाने, पेट्रोल पंप, अंडी, मांस, मच्छी, पशुखाद्य व चारा विक्री दुकाने, रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनीक, टेलिमेडीसीन्स सुविधा, केमिस्ट, औषधी दुकाने, वैद्यकीय साहित्याचे दुकाने, सर्व आरोग्य सेवा, वैद्यकीय प्रयोगशाळा व संग्रह केंद्रे, पशुवैद्यकीय रुग्णालये, दवाखाने, पॅथॉलॉजी, औषधी विक्री व पुरवठा, रुग्णवाहिका निर्मितीसह वैद्यकीय आरोग्याच्या पायाभूत सोयी सुविधांचे बांधकाम, डायग्नोस्टीक रुग्णालये, पुरवठा साखळी पुरविणारे फर्म, कच्चा माल व मध्यवर्ती घटकांचे युनिट, शेतकऱ्यांद्वारे शेतकरी गटाद्वारे किंवा शासनाद्वारे होणारी थेट विपणन हमी भावाने खरेदी करणाऱ्या यंत्रणांची कामे सुरू करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतीविषयक यंत्र व त्यांचे सुटे भाग विक्री दुकाने, दुरुस्ती करणारे दुकाने, शेतीसाठी भाडेतत्त्वावर अवजारे पुरवठा करणारे सेंटर्स, रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके यांचे उत्पादन वितरण व विक्री करणारी कृषी सेवा केंद्र, गॅस एजन्सी, इमारतींची बांधकामे सुरू झाली. बँका, सर्व एटीएम, एलआयसी, पोस्ट ऑफीस, केशकर्तनालये, स्पा सुरू झाले. इलेक्ट्रीशियन, संगणक अथवा मोबाईल दुरुस्ती, वाहन दुरुस्ती, नळ कारागीर, सुतार या सेवांनाही परवानगी देण्यात आली.

हे आहे बंदच
वैद्यकीय कारणाशिवाय किंवा या मार्गदर्शक तत्त्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तींना आंतर जिल्हा व आंतर राज्य संचार करण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे. अधिकृत परवानगी प्रवासी वाहतुकीस पूर्णपणे बंदी, सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहील, सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार व तत्सम, व्यायामशाळा व सामूहिक खेळांसाठी क्रीडा कॉम्प्लेक्स बंद ठेवण्यात आले. पानटपरी, चहाचे स्टॉल्स, उपाहारगृहे बंद होती.


इतर बातम्या
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...