agriculture news in Marathi, Attention to border districts to prevent smuggling of smuggling | Agrowon

निविष्ठांची तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती जिल्ह्यांवर लक्ष
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

यवतमाळ ः गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेत जिल्ह्यात या वर्षी एका एकरावरदेखील एचटी, बीटी लागणार नाही यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. इतर  राज्यांच्या सिमेवर असणाऱ्या जिल्हयांवर याअंतर्गंत करडी नजर ठेवली जात असून, अनधिकृत बियाणे व निविष्ठा तस्करी रोखण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.

यवतमाळ ः गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेत जिल्ह्यात या वर्षी एका एकरावरदेखील एचटी, बीटी लागणार नाही यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. इतर  राज्यांच्या सिमेवर असणाऱ्या जिल्हयांवर याअंतर्गंत करडी नजर ठेवली जात असून, अनधिकृत बियाणे व निविष्ठा तस्करी रोखण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.

 गेल्या वर्षीच्या हंगामात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर एचटी बियाणे लागवड झाली होती. फवारणीमुळे झालेल्या विषबाधांची दखल घेत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या पथकाने केलेल्या पाहणीत हे धक्‍कादायक वास्तव समोर आले होते. गेल्याच हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वांत आधी एचटी बियाणे लागवडीचे प्रकरण उघडकीस आले. तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या सीमेवर हे जिल्हे आहेत. याच जिल्ह्यातून एचटी बियाणे आणि बोगस निविष्ठांची तस्करी होते, असा खुलासा विविध समित्यांच्या पाहणीअंती झाला होता. गुजरातमधूनदेखील गेल्या हंगामात अमरावतीपर्यंत एचटी बियाण्यांची खेप आली होती. चंद्रपूरला हा माल जाणार होता. त्यामुळे या वर्षीच्या हंगामात सीमावर्ती राज्यातून होणाऱ्या तस्करीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश कृषी आयुक्‍तांनी दिले आहेत. त्याची दखल घेत अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी दोन दिवस यवतमाळमध्ये तळ ठोकला. विभागीय गुण नियंत्रक डॉ. पंकज चेडे यांनी तब्बल चार दिवस यवतमाळमध्ये विविध ठिकाणी धाडसत्र राबविले. विविध कृषी निविष्ठांचे नमुने या काळात घेण्यात आले. 

चंद्रपूरमध्ये सापडला सर्वाधिक साठा
या वर्षी हंगामाच्या सुरवातीलाच अतिशय दक्षपणे राजुरा उपविभागीय अधिकारी गोविंद मोरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात कारवायांसाठी आघाडी घेतली. त्यांच्या पुढाकाराने एकट्या राजुरा उपविभागात  ६८ लाख रुपयांचे एचटी बियाणे जप्त करण्यात आले. त्यासोबतच नऊ आरोपींना अटक करण्यात आली.

इतर बातम्या
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४६...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...