वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील बदलापासून सातत्याने उद्भवणारे रोगांचे उद्रेक अ
बातम्या
निविष्ठांची तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती जिल्ह्यांवर लक्ष
यवतमाळ ः गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेत जिल्ह्यात या वर्षी एका एकरावरदेखील एचटी, बीटी लागणार नाही यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. इतर राज्यांच्या सिमेवर असणाऱ्या जिल्हयांवर याअंतर्गंत करडी नजर ठेवली जात असून, अनधिकृत बियाणे व निविष्ठा तस्करी रोखण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.
यवतमाळ ः गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेत जिल्ह्यात या वर्षी एका एकरावरदेखील एचटी, बीटी लागणार नाही यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. इतर राज्यांच्या सिमेवर असणाऱ्या जिल्हयांवर याअंतर्गंत करडी नजर ठेवली जात असून, अनधिकृत बियाणे व निविष्ठा तस्करी रोखण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.
गेल्या वर्षीच्या हंगामात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर एचटी बियाणे लागवड झाली होती. फवारणीमुळे झालेल्या विषबाधांची दखल घेत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या पथकाने केलेल्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव समोर आले होते. गेल्याच हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वांत आधी एचटी बियाणे लागवडीचे प्रकरण उघडकीस आले. तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या सीमेवर हे जिल्हे आहेत. याच जिल्ह्यातून एचटी बियाणे आणि बोगस निविष्ठांची तस्करी होते, असा खुलासा विविध समित्यांच्या पाहणीअंती झाला होता. गुजरातमधूनदेखील गेल्या हंगामात अमरावतीपर्यंत एचटी बियाण्यांची खेप आली होती. चंद्रपूरला हा माल जाणार होता. त्यामुळे या वर्षीच्या हंगामात सीमावर्ती राज्यातून होणाऱ्या तस्करीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. त्याची दखल घेत अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी दोन दिवस यवतमाळमध्ये तळ ठोकला. विभागीय गुण नियंत्रक डॉ. पंकज चेडे यांनी तब्बल चार दिवस यवतमाळमध्ये विविध ठिकाणी धाडसत्र राबविले. विविध कृषी निविष्ठांचे नमुने या काळात घेण्यात आले.
चंद्रपूरमध्ये सापडला सर्वाधिक साठा
या वर्षी हंगामाच्या सुरवातीलाच अतिशय दक्षपणे राजुरा उपविभागीय अधिकारी गोविंद मोरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात कारवायांसाठी आघाडी घेतली. त्यांच्या पुढाकाराने एकट्या राजुरा उपविभागात ६८ लाख रुपयांचे एचटी बियाणे जप्त करण्यात आले. त्यासोबतच नऊ आरोपींना अटक करण्यात आली.
- 1 of 916
- ››