Agriculture news in marathi, Attention to District Bank's Online Examination Result | Agrowon

सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा निकालाकडे लक्ष
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी ५९०६ जणांनी ऑनलाइन परीक्षा दिली असून, त्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. अमरावती येथील संस्थेने ऑनलाइन परीक्षा घेतली असून, त्यांच्याकडून निकाल जाहीर केला आहे. अद्याप संस्थेने बॅंक प्रशासनाशी संपर्क साधला नाही. 

सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी ५९०६ जणांनी ऑनलाइन परीक्षा दिली असून, त्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. अमरावती येथील संस्थेने ऑनलाइन परीक्षा घेतली असून, त्यांच्याकडून निकाल जाहीर केला आहे. अद्याप संस्थेने बॅंक प्रशासनाशी संपर्क साधला नाही. 

जिल्हा बॅंकेतील ४०० कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मार्च २०१९ मध्ये मागवण्यात आले होते. नोकर भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी बॅंकेने अमरावती येथील संस्थेची नियुक्ती केली होती. या संस्थेमार्फतच सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, वसंतदादा पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी साखराळे या चार केंद्रांवर शनिवारी आणि रविवारी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. 

उमेदवारांची ९० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली असून, मुलाखतीसाठी दहा गुण ठेवण्यात आले आहेत. मुलाखतीमध्ये पाच गुण शैक्षणिक गुणवत्तेला आणि पाच गुण प्रश्‍नांसाठी असणार आहेत. बॅंकेच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील उमेदवारही बसले होते. ७ हजार १९८ उमेदवारांपैकी ५९०६ जणांनी ऑनलाइन परीक्षा दिली आहे. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे. 

संगणकावर परीक्षा घेण्यात आली असून, अमरावती येथील संस्थेमार्फत सर्व डाटा संकलित करण्याचे, तसेच बॅकअप घेण्याचे काम सुरू आहे. संगणकीय प्रणालीवर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर बॅंक प्रशासनाला त्याची माहिती दिली जाईल. अद्याप बॅंक प्रशासनाशी निकालाबाबत संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...