पर्यावरणातील बदलांकडे लक्ष देऊन शेती करा ः डॉ. देवसरकर

औरंगाबाद :शेतकऱ्यांनी पर्यावरणातील होणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन आपली शेती करावी,’’ असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी.बी.देवसरकर यांनी केले.
Attention to environmental changes Do farming by paying: Dr. Devasarkar
Attention to environmental changes Do farming by paying: Dr. Devasarkar

औरंगाबाद : ‘‘पर्यावरणातील सततच्या बदलाने आपल्या शेतीतही बदल झाले आहेत. पूर्वी शेतीमध्ये अधिक उत्पादन देणारे पण जास्त कालावधीचे वाण उपलब्ध होते. परंतु, आता कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे वाण उपलब्ध आहेत. तरी, शेतकऱ्यांनी पर्यावरणातील होणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन आपली शेती करावी,’’ असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी.बी.देवसरकर यांनी केले. 

कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद-१, विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र औरंगाबाद व कृषी विभाग औरंगाबादतर्फे शुक्रवारी (ता. ५) ऑनलाइन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबादचे प्रमुख डॉ. सूर्यकांत पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार हे उपस्थित होते. 

‘केव्हीके’च्या विषय विशेषज्ञ प्रा. गीता यादव यांनी बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यास उत्पन्नात १५ ते २० टक्के वाढ होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी पेरणीसाठी या यंत्राचा वापर करावा, असे आवाहन केले. ‘‘कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बीबीएफ यंत्र, सुधारित बियाणे व इतर सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार करावा, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असून आपण त्या दिशेने कार्य करावे, असे मत डॉ. मोटे यांनी मांडले. 

‘केव्हिके’चे प्रमुख डॉ. किशोर झाडे, डॉ. सूर्यकांत पवार, विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, कृषी विभागातील अधिकारी, विस्तार कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com