Agriculture news in Marathi Attention to Monday's meeting on banana crop criteria | Agrowon

केळी पीक निकषप्रश्‍नी सोमवारच्या बैठकीकडे लक्ष

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी परतावा निकष किंवा मानके शेतकरी हिताची न लागू केल्याने वादंग सुरू आहे. या प्रश्‍नी शेतकऱ्यांचा सततचा पाठपुरावा व शेतकऱ्यांमधील रोष लक्षात घेता राज्य सरकारने येत्या सोमवारी (ता. १९) विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

जळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी परतावा निकष किंवा मानके शेतकरी हिताची न लागू केल्याने वादंग सुरू आहे. या प्रश्‍नी शेतकऱ्यांचा सततचा पाठपुरावा व शेतकऱ्यांमधील रोष लक्षात घेता राज्य सरकारने येत्या सोमवारी (ता. १९) विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. या बैठकीत शेतकरी हिताचे निर्णय न झाल्यास योजनेवर बहिष्कार टाकण्याची व जनहित याचिका दाखल करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

धुळ्यात योजनेवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. तर जळगाव जिल्ह्यातही शेतकरी बँकांमध्ये जाऊन विमा हप्ता न कपात करण्याच्या लेखी सूचना बँक अधिकाऱ्यांना देत आहेत. अशातच शेतकऱ्यांचा रोष व जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा लक्षात घेऊन राज्य सरकारने या प्रश्‍नी विशेष बैठक बोलावली आहे. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे कृषिमंत्री, जळगावचे पालकमंत्री, जळगाव जिल्ह्यातील लोकसभेचे दोन्ही खासदार, हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व काही शेतकरी उपस्थित राहतील.

या बैठकीत योजना शेतकरी पूरक करण्यात येईल, अशी अपेक्षा खानदेशातील केळी उत्पादकांना आहे. बैठकीचे आयोजन केल्याने शेतकरी विमा योजनेत सहभागी न होण्यासंबंधीचे पत्र बँकांना देणे तूर्त टाळत आहेत. या बैठकीत शेतकरी प्रतिनिधीदेखील बोलावण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्यास योजनेवर बहिष्कार टाकू व जनहित याचिकादेखील न्यायालयात दाखल करू, असे शेतकरी प्रतिनिधी राहुल पाटील (बलवाडी, ता. रावेर) म्हणाले.

पालकमंत्र्यांनी चुकीची माहिती का दिली
या योजनेची मानके किंवा परतावा निकष शेतकरी विरोधी असल्याच्या मुद्द्यावर शेतकरी प्रतिनिधींनी तीनदा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. या भेटींमध्ये पालकमंत्री पाटील परतावा निकष शेतकरी पूरकच असलीत. जे निकष २०१९-२० मध्ये लागू केले होते, तेच निकष लागू केले जातील, असे आश्‍वासन दिले. परंतु निकष नेमके शेतकरी विरोधीच लागू केले. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.


इतर ताज्या घडामोडी
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...
चिखलीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘रयत’...बुलडाणा : चिखली तालुक्यातील पळसखेडा जयंती फाटा ते...
नांदेड जिल्ह्यात ओल्या दुष्काळासाठी...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपासह बागायती...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
सरकारने नाकर्तेपणा दाखवू नये : दरकेर सोलापूर ः राज्य सरकार पंचनाम्याशिवाय मदत...
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...