पाचोरा बाजार समितीत लिलाव बंद

जळगाव ः जळगाव, पाचोरा व अमळनेरात आठवडाभर लॉकडाउनची कार्यवाही प्रशासन राबवित आहे. परंतु यात पाचोरा व जळगाव येथील बाजार समितीचे कामकाज विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
Auction closed at Pachora Market Committee
Auction closed at Pachora Market Committee

जळगाव ः जळगाव, पाचोरा व अमळनेरात आठवडाभर लॉकडाउनची कार्यवाही प्रशासन राबवित आहे. परंतु यात पाचोरा व जळगाव येथील बाजार समितीचे कामकाज विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

ग्राहकांनादेखील चांगल्या भाज्या मिळणे अशक्‍य होणार आहे. यामुळे या समस्येवर प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे. पाचोरा येथील बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केट यार्डात लिलाव बंद झाले आहेत. तसेच स्वच्छतेच्या कारणानेदेखील बाजार समितीने लिलाव बंद केले आहेत. बाजार समितीच्या यार्डात पहाटेच्या वेळेस अस्वच्छता पसरविली जाते. त्याचा रहिवाशांना त्रास होतो. स्वच्छतेवर मोठा खर्च करावा लागतो, असे कारणही बाजार समितीने दिले आहे.

यामुळे मागील दोन-तीन दिवस लिलाव प्रक्रिया बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक रस्त्यावर सकाळीच पार पडत होती. यातच मंगळवार(ता. ७)पासून आठवडाभर जळगाव, पाचोरा व अमळनेर येथे लॉकडाउन पाळले जाणार आहे. यामुळे जळगाव व पाचोरा येथील भाजीपाला मार्केट व बाजार समित्यांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

अनेक शेतकऱ्यांना पहाटे बाजार समितीच्या प्रवेशद्वारानजीक भाजीपाल्याची विक्री कमी दरात खरेदीदारांना करावी लागली. अनेक अडतदार लॉकडाउनमुळे बाजारात आलेच नाहीत. सुरक्षित अंतराचे पालन होत नसल्याचे कारण सांगून प्रशासनाने भाजीपाला मार्केट यार्डातील लिलाव प्रक्रियेबाबत कडक सूचना दिल्या आहेत. गर्दी, गोंधळ झाला तर कारवाईचेही बजावले आहे. यामुळे अडतदारांमध्ये परवाना रद्द होण्याची भीती आहे. जळगाव, पाचोरा येथे स्थानिक जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर भागातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. जळगावात औरंगाबाद, जालना, बुलडाणा  येथील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. तर पाचोरा येथे मालेगाव, नांदगाव, धुळे भागातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com