सोलापूर बाजार समितीतीत लिलाव ३१ मार्चपर्यंत बंद

सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने काही मोजक्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कामकाज सरू ठेवले असले, तरी बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी मात्र येत्या ३१ मार्चपर्यंत लिलाव बंद ठेवल्याने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा अडचण झाली आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २६) बाजार समितीत तशी फारशी वर्दळ राहिली नाही.
Auction closed in Solapur Market Committee

मागील तीन दिवस बाजार समितीचे व्यवहार सुरळीत सुरू होते. पण आज काही भाजीपाला आणि फळभाज्याच्या मोजक्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे गेल्या दोन दिवसांत राहिलेल्या भाजीपाल्याची विक्री केली. पण तेही काही वेळातच बंद करण्यात आल्याने फारसे व्यवहार होऊ शकले नाहीत. त्यात पुन्हा शेतकऱ्यांची अडचण झाली. 

भाजीपाला व फळभाज्या व्यापारी संघाने या आधीच ३१ मार्चपर्यंत लिलाव बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. पण ज्यांना याची पूर्वकल्पना नव्हती, त्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विनवणी करुन माल त्यांच्याकडे ठेवून दिला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा एकीकडे हे चित्र असताना बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज सुरू होते. आम्ही बाजार सुरू ठेवण्यास सांगितले आहे, पण व्यापाऱ्यांनी बंद केला आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com