देवगडात मासळी लिलावास प्रशासनाकडून हिरवा कंदील

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील देवगड बंदरात मासळी लिलावास प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र, सामाजिक अतंराची अट कायम राहणार आहे. मासळी लिलाव सुरू करण्यात यावा, अशी सूचना कणकवलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कोटेकर यांनी दिल्या आहेत.
The auction of fish in Devgad is grant from administration
The auction of fish in Devgad is grant from administration

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील देवगड बंदरात मासळी लिलावास प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र, सामाजिक अतंराची अट कायम राहणार आहे. मासळी लिलाव सुरू करण्यात यावा, अशी सूचना कणकवलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कोटेकर यांनी दिल्या आहेत.

‘कोरोना’च्या संकटामुळे देशात लॉकडाऊन नंतर मासळी लिलाव बंद करण्यात आले होते. मासेमारी पूर्णतः बंद झाल्यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली होती. आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांकडून सातत्याने मासळी लिलाव करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली जात होती. 

परंतु लिलावाच्या वेळी होणारी गर्दी आणि त्यातून असणारे धोके यामुळे प्रशासनाने लिलावास परवानगी दिली नव्हती. परंतु जिल्हा सध्या ‘कोरोना’मुक्त आहे. त्यातच सोमवार (ता. २०) पासून जिल्हा अंतर्गत आवश्‍यक सेवा सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. त्या अनुषंगाने रविवारी (ता. १९) कणकवलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कोटेकर यांनी देवगड बंदरात ज्या ठिकाणी मासळी लिलाव होतो त्या ठिकाणची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, मच्छीमार नेते भाई खोबरेकर, जगन्नाथ कोयंडे, विनायक प्रभु, परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. कोटेकर यांनी उपस्थित मच्छिमारांना सामाजिक अतंराचे पालन करून मासळी लिलाव करण्यास अनुमती दिली. हा लिलाव करताना कोणत्याही प्रकारे गर्दी न करण्याची त्यांची सूचना केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com