agriculture news in Marathi auction in lac of madgyal sheep Maharashtra | Agrowon

सांगोल्यात माडग्याळ मेंढ्याला लाखात बोली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

तांबूस, पांढरा ठिपक्याचा रंग, दिसायला रुबाबदार आणि राघुसारखी चोच, बोलाईच्या मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या माडग्याळ मेंढ्यांना काही लाखांत बोली लावली जात आहे.

सोलापूर ः  तांबूस, पांढरा ठिपक्याचा रंग, दिसायला रुबाबदार आणि राघुसारखी चोच, बोलाईच्या मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या माडग्याळ मेंढा सांगोला, जत भागातील आकर्षण ठरले आहे. मेंढ्यातील जातिवंत नर म्हणून माडग्याळकडे पाहिले जाते. त्यामुळे या मेंढ्यांना आता काही लाखांत बोली लावली जात आहे. प्रामुख्याने पैदाशीसाठी या मेंढ्यांना पसंती आहेच, पण काही जण नुसती हौस म्हणूनही त्याचा सांभाळ करतात, हौस कसली नादच म्हणा. त्यामुळेच तर आज काही हजारात असणाऱ्या मेंढ्याला लाखात बोली लावल्या जात आहेत.   

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, सांगली जिल्ह्यांतील जत व परिसरात माडग्याळ मेंढ्यांचे सर्वाधिक संगोपन होते. सांगोल्यातील चांडोलेवाडीच्या बाबू मेटकरी यांच्याकडील चार दाती राघुच्या चोचीसारखा, चिवळ तोंडाचा सहा महिने वयाच्या मेंढ्याला नुकताच त्यांनी कर्नाटकातील इंडी तालुक्यातील पडगानूर येथील यल्लाप्पा देशमुख यांना विकला आहे. देशमुखही आता पैदाशीसाठीच त्याचा उपयोग करणार आहेत. त्यासाठी लाखावर व्यवहार झाला आहे. त्यापैकी निम्म्या पैशाची देवाण-घेवाण झाली आहे. उर्वरित पैसे दोन महिन्यांनी देण्याची बोली आहे.

चांडोलेवाडीच्या याच बाबूरावाकडे ५० मेंढ्या आहेत. त्यात सर्जा या दोन वर्षांच्या मेंढ्यालाही नुकतीच आणखी काही लाखात बोली लागली आहे. पण त्यांनी तो विकण्याऐवजी घरात हौस म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मेटकरी म्हणाले, ‘‘सगळंच काही पैशासाठी करायचं नसतं, आम्हाला नाद हाय म्हणून करतुय, आपल्याला पहिल्यापासून शौक हाय त्येचा.’’ मेटकरी यांच्याकडून मेंढा घेतलेल्या यल्लाप्पा देशमुख यांनाही आपण हा मेंढा का खरेदी केला, हे विचारता, त्यांनीही केवळ पैदाशीसाठी घेतला असल्याचे सांगितले.

मेंढ्यांचा खुराक
मेंढा दिसायला रुबाबदार आहेच. पण त्याचा खुराकही तसाच आहे. त्यामुळे उंच आणि वजनदार दिसतो. त्याला सकाळी आणि संध्याकाळी एक लिटर म्हशीचे दूध दिले जाते. तसेच दोन्हीवेळी प्रत्येकी एक किलो ज्वारी आणि किमान अर्धा किलो दोन्हीवेळेला शेवरीचा चारा दिला जातो.

माडग्याळ ही रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणारी, विशिष्ट मांस असणारी मेंढ्याची जात आहे. विशेषतः बोलाई मटणासाठी प्रसिद्ध आहे. मेंढ्याची ही जात जातिवंत आहे. त्यामुळे पैदाशीसाठी उपयोग केला जातो. पण पैदाशी मेंढ्यासाठी फार तर २० हजारांपर्यंत दर आहे. पण या मेंढ्याला मिळणारी रक्कम थोडी जास्तच वाटते. पण हौसेपुढे काय ? 
- डॅा. नितीन मार्कंडेय, प्राचार्य, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी

 


इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...