नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीसाठी होणार जमिनींचा लिलाव

जिल्‍ह्यातील थकबाकीदार सभासदांनी कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा दिनांक ३१ मार्च २०१९ अखेर करून बँकेस सहकार्य करावे. - केदा आहेर, अध्यक्ष, नाशिक जिल्हा बँक.
कर्जवसुलीसाठी होणार जमिनींचा लिलाव
कर्जवसुलीसाठी होणार जमिनींचा लिलाव

नाशिक  : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मागील दोन वर्षांपासून आर्थिक कोंडीत सापडली आहे. त्यामुळे तिला ऊर्जितावस्था देण्यासाठी विविध हालचाली सुरू आहेत. याच उद्देशाने जिल्हा बँकेने कार्यवाहिस सुरवात केली आहे. विविध कार्यकारी संस्थांचे मोठे थकबाकीदार, मोठ्या रकमेचे थकबाकीदार यांच्यावर सहकार कायदा नियम १०७ अन्वये बँकेचा बोजा चढवून जप्त केलेल्या जमिनींचा लिलाव करण्याचे ठरविण्यात आले आहे. 

चालू आर्थिक वर्षाच्या अखेर थकबाकी वसुलीसाठी बँकेने १ मार्चपासून वसुली मोहीम सुरू केली. या कामकाजासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिली आहे. त्यांच्या सुट्ट्याही रद्द केल्या आहेत. वसुलीच्या कामासाठी ५ पथके नेमली आहेत. वसुली पथकाच्या सदस्यांनी मोठ्या सहकारी संस्था व थकबाकीदारांच्या जमिनीबाबत लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

काही थकबाकीदारांकडे मोठ्या स्वरूपाची थकबाकी असल्याने व कर्जवसुलीस सहकार्य करत नसल्याने ही कार्यवाही करण्यात येत आहे. 

या थकबाकीदारांच्या जमिनी जप्त करून बँकेचे नाव लावून त्या अपसेट प्राइज मंजुरीसाठी सहायक निबंधक, नाशिक यांच्याकडे प्रकरण मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर कर्ज थकलेल्या सभासदांना कर्ज भरण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली होती. मात्र यास प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा बँकेने जाहीर लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. याबाबत ११ एप्रिल २०१९ रोजी लिलाव प्रक्रिया होणार असल्याचे सांगितले. संपूर्ण जिल्ह्यातील ७० थकबाकीदार सभासदांची जमीन लिलावाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com