Agriculture news in marathi The auction started in Rahuri, but the incoming, no rate | Agrowon

राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर नाही

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 मे 2020

राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन महिने खंडित झालेला राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचा मोंढा शुक्रवारी सुरू झाला; मात्र, कोरोनाचा मोठा फटका कांद्याला बसला आहे. आवक कमी राहिली आणि भावही घसरले. 

राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन महिने खंडित झालेला राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचा मोंढा शुक्रवारी सुरू झाला; मात्र, कोरोनाचा मोठा फटका कांद्याला बसला आहे. आवक कमी राहिली आणि भावही घसरले. 

शेतकऱ्यांचा नवीन कांदा निघाला. बहुतांश शेतकऱ्यांनी चाळी भरण्यास प्राधान्य दिले. गरजू शेतकऱ्यांनी कांद्याचा मोंढा सुरू करण्याची मागणी केली. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीचे आवाहन केले. नोंदणीकृत शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाने बाजार समितीला कळविली. प्राधान्य क्रमानुसार बाजार समितीने शेतकऱ्यांना कांदा आणण्यास सांगितले. 

शुक्रवारी मोंढ्याच्या पहिल्या दिवशी अवघ्या एक हजार ४१५ कांदा गोण्यांची आवक झाली. त्यात कांदाचाळी भरताना निवडीचा खराब कांदा जास्त प्रमाणात होता. कोरोनामुळे घटलेली मागणी, अशाश्‍वत बाजारपेठ, अत्यल्प आवक, खराब माल अशा कारणांमुळे कांद्याचे भाव घसरले. कोरोना संकटापूर्वी राहुरी बाजार समितीत कांद्याचा शेवटचा लिलाव १७ मार्च रोजी झाला होता. त्या वेळी तब्बल ४१ हजार ९३२ कांदा गोण्यांची आवक झाली. 

शुक्रवारचा प्रती क्विंटल दर (कंसात दोन महिन्यांपूर्वीचा दर) 

क्रमांक एक ५७५ ते ७०० (१२०० ते १६००)
क्रमांक दोन ३५० ते ५७०, (६५० ते ११९५) 
क्रमांक तीन १०० ते ३४५, (१०० ते ६४५ 
गोल्टी २०० ते ५००, (९०० ते १४००) 

 
 


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...