पुणे बाजार समितीत तिसऱ्या दिवशीही व्यवहार सुरळीत 

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणात ठेवत, सोशल डिस्टनिंगची खबरदारी घेत सुरु असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याचे व्यवहार मंगळवारी (ता.३१) तिसऱ्या दिवशीही सुरळीत होते.
pune apmc
pune apmc

पुणे: कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणात ठेवत, सोशल डिस्टनिंगची खबरदारी घेत सुरु असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याचे व्यवहार मंगळवारी (ता.३१) तिसऱ्या दिवशीही सुरळीत होते. मंगळवारी मुख्य आवारासह उपबाजारात सुमारे ६९२ लहान मोठ्या वाहनांमधून सुमारे २० हजार क्विंटल आवक झाली होती, अशी माहिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.  कोरोना विषाणूचा फैलावू होऊन नये यासाठीच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी आणि खबरदारी घेत पुणे बाजार समिती गेल्या तीन दिवसांपासून सुरळीत सुरु आहे. आजच्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी नियंत्रित राहिल्याने दर देखील स्थिर असल्याचे देशमुख यांनी सांगितले. अशाच प्रकारे नियंत्रित आवक आणि मागणी ठेवण्याचे आमचे प्रयत्न असून, यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील शेतमालाला देखील उठाव होत असून, ग्राहकांची देखील गरज भागविली जात आहे, असेही देशमुख यांनी नमूद केले.  पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची झालेली आवक (क्विंंटलमध्ये) 

आवार वाहनांची आवक भाजीपाला आवक 
मुख्य बाजार ४३० १३ हजार ७०० क्विंटल 
मोशी ११० २ हजार ४०० 
मांजरी १३२ ३ हजार ७०० 
खडकी २० १९० 
एकूण ६९२ १९ हजार ९९० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com