agriculture news in Marathi auction on track in Pune APMC Maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत तिसऱ्या दिवशीही व्यवहार सुरळीत 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणात ठेवत, सोशल डिस्टनिंगची खबरदारी घेत सुरु असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याचे व्यवहार मंगळवारी (ता.३१) तिसऱ्या दिवशीही सुरळीत होते.

पुणे: कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणात ठेवत, सोशल डिस्टनिंगची खबरदारी घेत सुरु असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याचे व्यवहार मंगळवारी (ता.३१) तिसऱ्या दिवशीही सुरळीत होते. मंगळवारी मुख्य आवारासह उपबाजारात सुमारे ६९२ लहान मोठ्या वाहनांमधून सुमारे २० हजार क्विंटल आवक झाली होती, अशी माहिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली. 

कोरोना विषाणूचा फैलावू होऊन नये यासाठीच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी आणि खबरदारी घेत पुणे बाजार समिती गेल्या तीन दिवसांपासून सुरळीत सुरु आहे. आजच्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी नियंत्रित राहिल्याने दर देखील स्थिर असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

अशाच प्रकारे नियंत्रित आवक आणि मागणी ठेवण्याचे आमचे प्रयत्न असून, यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील शेतमालाला देखील उठाव होत असून, ग्राहकांची देखील गरज भागविली जात आहे, असेही देशमुख यांनी नमूद केले. 

पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची झालेली आवक (क्विंंटलमध्ये) 

आवार वाहनांची आवक भाजीपाला आवक 
मुख्य बाजार ४३० १३ हजार ७०० क्विंटल 
मोशी ११० २ हजार ४०० 
मांजरी १३२ ३ हजार ७०० 
खडकी २० १९० 
एकूण ६९२ १९ हजार ९९० 

 


इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...