agriculture news in Marathi auction for upsarpanch post in mahati Maharashtra | Agrowon

महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची बोली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा जाहीर लिलाव करून लोकशाहीची थट्टा केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा जाहीर लिलाव करून लोकशाहीची थट्टा केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुदखेड तालुक्यातील महाटी येथे शनिवारी (ता.२१) गावकऱ्यांनी साडेदहा लाखांची बोली लावून उपसरपंचपद बहाल केले. 

मुदत संपलेल्या महाटी ग्रामपंचायतीसाठी सरपंच, उपसरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. हे गाव गोदावरीच्या काठावर असून, जिल्ह्यातील सर्वांत जास्त वीटभट्ट्या आहेत. गावालगतच्या गोदावरी नदीमुळे वाळू तसेच वीटभट्टीसाठी लागणाऱ्या मातीच्या अवैध व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना भाव आला आहे.

ग्रामपंचायत आपल्या ताब्यात यावी म्हणून अवैध व्यवसायवाल्यांनी चक्क पदाची बोलीच लावल्याचे पाहावयास मिळाले. तसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला. शनिवारी (ता. २१) रात्री आठच्या सुमारास गावातील ओट्यावर गावकरी एकत्रित जमले. उपसरपंचपदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार गावातील विद्यमान सरपंच प्रतिनिधी बळिराम पाटील ढगे, निवृत्त रेल्वे कर्मचारी व्यंकट ढगे, माजी सरपंच माधवराव तानाजी ढगे यांनी बोलीत सहभाग घेतला.

बोलीची सुरुवात सात लाख एक हजार रुपये होती. स्पर्धा वाढत गेली तशी बोलीही वाढली. अखेर साडेदहा लाखांची शेवटची बोली माधवराव तानाजी ढगे यांनी लावली. गावकऱ्यांनी त्याला हिरवा कंदील दिला. अशाप्रकारे या गावात लिलावाने उपसरपंचपद साडेदहा लाखांत विकले गेले. या गावातील सरपंचपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे.

बोलीतील रक्कम शाळेसाठी
उपसरपंचपदाच्या बोलीचा व्हिडिओ झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानुसार बोलीत भाग घेतलेल्या बळिराम पाटील ढगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लावलेली बोली खरी असल्याचे सांगितले. गावातील शाळेसाठी डिजिटल खोल्या बनविण्याचा गावकऱ्यांचा मानस होता. बोलीतील पैसा शाळा सुधारण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...