औरंगाबादमधील ९५३ गाव-वाड्यांची तहान टॅंकरवर

औरंगाबादमधील ९५३ गाव-वाड्यांची तहान टॅंकरवर
औरंगाबादमधील ९५३ गाव-वाड्यांची तहान टॅंकरवर

औरंगाबाद : पावसाळ्याच्या तोंडावर मराठवाड्यातील ७७६ गावे व १७७ वाड्यांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. सर्वाधिक पाणीटंचाईची झळ औरंगाबाद जिल्ह्यात बसत असून, या जिल्ह्यातील ५०२ गावं व ७३ वाड्यांची तहान टॅंकरने भागविली जात आहे. टंचाईग्रस्त ७७६ गावं व १७७ वाड्यांची तहान भागविण्यासाठी ९६२ टॅंकरची सोय करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्हा वगळता इतर आठही जिल्ह्यांत पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ ग्रामीण भागातील जनतेवर आली आहे. जवळपास १५ लाख ६९ हजार ७५ लोकांची तहान आजघडीला टॅंकरवर अवलंबून आहे. त्यामध्ये सर्वाधिक जवळपास १० लाख ६१ हजार ९३३ लोक एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. जालना जिल्ह्यातील २ लाख ५३ हजार ९१६, परभणीमधील ४२ हजार १२८, हिंगोलीतील २७ हजार ४६८, नांदेडमधील १ लाख ६४ हजार ४९५, बीडमधील १८ हजार १४९; तर लातूर जिल्ह्यातील ९८६ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. औरंगाबाद जिल्ह्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातील १२४ गावे व १७ वाड्यांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी १३९ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील ३७ गाव व १३ टंचाईग्रस्त वाड्यांची तहान भागविण्यासाठी ४२ टॅंकर सुरू आहेत. हिंगोलीत १९ गाव व ४ वाड्यांची तहान २१ टॅंकरने भागविली जात आहे. नांदेड जिल्ह्यात ७८ गाव ६६ वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.

टंचाई असलेली गावे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुका टंचाईच्या रडारवर आहे. या तालुक्‍यातील १०२ गावांना टंचाईची झळ सोसावी लागत आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद तालुक्‍यातील ८६ गावे व २६ वाड्या, फुलंब्री तालुक्‍यातील ६१ गावे व ५ वाड्या, पैठण तालुक्‍यातील ४७ गावे व ३ वाड्या, वैजापूर तालुक्‍यातील ७१ गावे व ४ वाड्या, खुल्ताबाद तालुक्‍यातील २८ गावे व १४ वाड्या, कन्नड तालुक्‍यातील ३५ गावे व ८ वाड्या, सिल्लोड तालुक्‍यातील ६९ गावे व १३ वाड्या; तर सोयगाव तालुक्‍यातील ३ गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com