agriculture news in marathi Aurangabad Bench orders to division agri coDirector to be present in court on 13th july | Agrowon

...अन्यथा कृषी सहसंचालकांना अटक करून हजर करा : औरंगाबाद खंडपीठ  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी १३ जुलैला सकाळी साडेदहा वाजता खंडपीठात प्रत्यक्ष हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मंगळवारी (ता.७) न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी १३ जुलैला सकाळी साडेदहा वाजता खंडपीठात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले. हजर न झाल्यास त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचेही आदेशात म्हटले आहे. 

कृषी सहसंचालक डॉ. जाधव यांच्यातर्फे सादर करण्यात आलेल्या माहितीवर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यात बियाणे उत्पादक कंपन्या आणि विक्रेते यांना वाचवून शेतकऱ्यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत असून, डॉ. जाधव यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देत शेतकऱ्यांविरोधात वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. राज्य शासनातर्फे ॲड. डी. आर. काळे तर केंद्र शासनातर्फे ॲडिशनल सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे काम पाहत आहेत. पुढील सुनावणी १३ जुलैरोजी होईल. 

मंगळवारच्या सुनावणीत शासनातर्फे अशा प्रकारच्या २३ तक्रारी दाखल झाल्याचे तसेच तक्रारी प्राप्त झालेल्या कंपन्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. अशा कंपन्यांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते; मात्र २२ हजार ८३१ तक्रारी प्राप्त होऊनही बियाणे निरीक्षकांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या नाहीत.

वरील तक्रारींपैकी केवळ २३ तक्रारींवर फौजदारी कारवाई झाली आहे, यावरून सरकारी अधिकारी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते असे ॲड. पी. पी. मोरे यांनी निर्दशनास आणून दिल्यानंतर खंडपीठाने निरीक्षण नोंदविले, की शेतकऱ्यांनी तक्रार कृषी विभाग घेत नसेल तर शेतकऱ्यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. पोलिसांनी त्यावर कारवाई करून गरज पडल्यास बियाणे कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यासाठी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना पाचारण करावे, ते न आल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावे असेही स्पष्ट केले.

तक्रारींमध्ये औरंगाबादची ग्रीन गोल्ड आणि इंदूरचे ईगल सीड या कंपन्यांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या विशिष्ट बॅचमधील बियाणे सदोष आढळल्याचे दिसून येत असल्याने या बॅचमधील बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी थेट दाखल करून घ्या, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले. 

हातमिळवणी करणे महाबीजला महागात पडेल 
याचिकेत खंडपीठ नियुक्त अमायकस क्युरी (न्यायालयाचे मित्र) ॲड. पी. पी. मोरे यांनी सोयाबीन बियाणे वितरणात महाबीजची मोठी भूमिका असल्याचे निदर्शनास आणून देत महाबीजचे चेअरमन आणि संचालक यांना प्रतिवादी करण्याची विनंती केली. यावर, त्यांची दोषी कंपन्यांशी हातमिळवणी असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. तसेच हे बियाणे प्रमाणित करण्यासंदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्याचेही निर्देश देण्यात आले. दुबार पेरणी करूनही उगवण न झाल्याच्या बातम्याही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याची नोंद खंडपीठाने घेतली आणि संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याचे निर्देश दिले. विभागातील सर्व पोलिस अधीक्षक तसेच पोलिस आयुक्तांना अशा तक्रारी दाखल करून घेण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.


इतर अॅग्रो विशेष
टोमॅटोवर जिवाणूजन्य ठिपक्या रोगाचा...नाशिक: चालू वर्षी टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा ५०...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पातील उपयुक्त...
परस्पर पुनर्गठन केल्याने शेतकरी...दानापूर, जि. अकोला ः येथील सेवा सहकारी सोसायटीने...
राज्यातील साखर कारखान्यांकडून एफआरपीचे...पुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी लॉकडाउन आणि...
शेतमाल नियमनमुक्ती : आहे मनोहर, तरी... पुणे ः संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीचे स्वागतच आहे....
कृषी सुविधा निधीला आजपासून प्रारंभनवी दिल्ली ः कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या...
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
गुणवत्ता अन् विश्वासाचा ब्रॅण्ड ः...प्रथम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सीताफळ उत्पादक...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
दूध दराच्या दुखण्यावरील इलाजहल्लीच झालेल्या दोन आंदोलनात दूध दराच्या दोन...
‘रेपो रेट’शी आपला काय संबंध?भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) ऑगस्ट,...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...