दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
बाजारभाव बातम्या
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपये
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२८) गाजराची ५५ क्विंटल आवक झाली. या गाजराला सरासरी १८०० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२८) गाजराची ५५ क्विंटल आवक झाली. या गाजराला सरासरी १८०० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
वाटाण्याची ५२ क्विंटल आवक झाली. त्यास सरासरी २७५० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मोसंबीची आवक २६ क्विंटल, तर सरासरी दर २५०० रूपये प्रतिक्विंटल राहिला. १२ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबांना सरासरी १७५० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. अंजीरची आवक ५ क्विंटल, तर सरासरी दर ३५०० रूपये प्रतिक्विंटल राहिला. २० क्विंटल आवक झालेल्या पेरूचे सरासरी दर ६०० रूपये प्रतिक्विंटल राहिले.
संत्र्यांची आवक ३३ क्विंटल, तर सरासरी दर १३०० रूपये प्रतिक्विंटल राहिले. ६ क्विंटल आवक झालेल्या वालशेंगाचा सरासरी दर १७०० रूपये प्रतिक्विंटल राहिला.
मक्याची आवक १७ क्विंटल झाली. त्यास सरासरी ६०० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ६७ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे सरासरी दर ५०० रूपये प्रतिक्विंटल राहिले. लिंबांची आवक १३ क्विंटल, तर सरासरी दर ६०० रूपये प्रतिक्विंटल राहिला. ६ क्विंटल आवक झालेल्या कारल्याला सरासरी २००० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
फ्लॉवरची आवक ४५ क्विंटल, तर सरासरी दर ५५० रूपये प्रतिक्विंटल राहिला. १५ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे सरासरी दर १४०० रूपये प्रतिक्विंटल राहिले.
शेवग्याची आवक ७ क्विंटल झाली. सरासरी ७००० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ७ क्विंटल आवक झालेल्या भेंडीचे सरासरी दर १४०० रूपये प्रतिक्विंटल राहिले. २१ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे सरासरी दर ६०० रूपये राहिले. ४ क्विंटल आवक झालेल्या गवारला सरासरी २००० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
वांग्यांची आवक ३७ क्विंटल, तर सरासरी दर १००० रूपये प्रतिक्विंटल राहिले. ७३ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला सरासरी १५०० रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कांद्याची ६६७ क्विंटल आवक झाली. सरासरी दर १९०० रूपये प्रतिक्विंटल राहिले. हिरव्या मिरचीची आवक ३८ क्विंटल, तर सरासरी दर २२५० रूपये प्रतिक्विंटल राहिला.
मेथी २५० रूपये प्रतिशेकडा
मेथीची आवक ७७०० जुड्या, तर सरासरी दर २५० रूपये प्रतिशेकडा राहिले. ६५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला सरासरी १४० रूपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. तर, १३ हजार ४०० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे सरासरी दर १०० रूपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
- 1 of 65
- ››