Agriculture news in marathi Aurangabad City will get a turnover of 67 lack by the buying vegetables | Agrowon

औरंगाबाद शहरात फळे, भाजीपाला थेट विक्रीतून ६७ लाखांची उलाढाल

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

जवळपास १५ दिवसांपासून थेट विक्री करीत आहोत. पोलिस, कृषी, ‘आत्मा’ अशा सर्वच विभागांचे सहकार्य मिळते आहे. वाहतुकीत कोणतीही अडचण नाही. 
- भाऊसाहेब शेळके, भूमिपुत्र शेतकरी गट भिवधानोरा, ता.गंगापूर 

ग्राहक जोडले जात आहेत. त्यांची गरज कळून कायमस्वरूपी शेतमाल विक्रीची साखळी तयार होत आहे. जवळपास १७५ ग्राहक आजपर्यंत जोडले गेले आहेत. 
- योगेश कोठुळे, जय जवान, जय किसान शेतकरी मंडळ 
देवगाव ता पैठण 

औरंगाबाद : शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतर्गत औरंगाबाद शहरात फळे, भाजीपाला विक्री सुरू आहे. त्याद्वारे आतापर्यंत ६७ लाख १२ हजार ७९५ रुपयांची उलाढाल झाली आहे. शेतकऱ्यांच्या थेट शेतमाल विक्रीच्या धडपडीला कृषी विभाग, ‘आत्मा’सह जिल्हा प्रशासन, पोलिस, सहकार विभाग व गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींचे सहकार्य मिळते आहे. 

‘लॉकडाउन’मुळे शेतातील उत्पादित फळे, भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा म्हणून शेतकरी गट, कृषी विभाग, ‘आत्मा’ व जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची संकल्पना पुढे आली. २४ गट व शेतकऱ्यांच्या तयारीपासून सुरू सुरु झालेला हा उपक्रम आता जवळपास ५९ शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे.

शेतकरी गट आपल्याकडून फळे, भाजीपाला घेणाऱ्या ग्राहकांच्या नोंदी भ्रमणध्वनी क्रमांकासह घेत आहेत. २९ मार्च पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत सुरुवातीला दिवसाला दोन लाखापर्यंत होणारी उलाढाल आता दिवसाला तीन ते पाच लाखापर्यंत पोहोचली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, १७ एप्रिलला एकाच दिवशी ६३२५ किलो भाजीपाला व ८६१० किलो फळांची विक्री झाली. यामधून जवळपास ३ लाख ९५ हजार ८७५ रुपये उलाढाल झाली. तर, २९ मार्च ते १७ एप्रिल दरम्यान १ लाख ६ हजार ६२१ किलो भाजीपाला व १ लाख ६६ हजार ४५९ किलो फळे अशी २ लाख ७३ हजार ८० किलोंची विक्री झाली. त्यातून जवळपास ६७ लाख १२ हजार ७९५ रुपये शेतकऱ्यांना मिळाले. 

वाजवी दर, ‘सोशल डिस्टन्सिंग’चा वापर मास्क, सॅनिटरायझर यासह इतर खबरदारीच्या उपाययोजना अमलात आणून शेतकरी आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करीत आहेत. जिल्ह्याच्या विविध भागातून शहरात येणाऱ्या या शेतकरी गटांना सर्वच विभागांचे सहकार्य मिळत हे. वाहतुकीत कोणतीही अडचण येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

फळे-भाजीपाला बाजाराचे विकेंद्रीकरण 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये होणारी गर्दी थांबविण्यासाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रात जवळपास ४० ठिकाणी भाजीपाला, फळे बाजार सुरू करण्यात आला. ‘सोशल डिस्टन्सिंग’बाबत आवश्यक खबरदारी घेऊन हे बाजार सुरू आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे बाजार समितीत आता केवळ ठोक फळे, भाजीपाला खरेदी-विक्री सुरू आहे, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले. 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...