औरंगाबाद जिल्हा बॅंकेवर शेतकरी विकास पॅनेलची सत्ता

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी सोमवारी (ता २२) झालेल्या मतमोजणीअंती बॅंकेच्या संचालक मंडळात शेतकरी विकास पॅनेलचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
औरंगाबाद जिल्हा बॅंकेवर  शेतकरी विकास पॅनेलची सत्ता On Aurangabad District Bank Power of Farmers Development Panel
औरंगाबाद जिल्हा बॅंकेवर  शेतकरी विकास पॅनेलची सत्ता On Aurangabad District Bank Power of Farmers Development Panel

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी सोमवारी (ता २२) झालेल्या मतमोजणीअंती बॅंकेच्या संचालक मंडळात शेतकरी विकास पॅनेलचे  वर्चस्व सिद्ध झाले आहे. वर्चस्व सिद्ध झाले असले तरी या पॅनेलच्या प्रमुख नेत्यांपैकी माजी विधानसभा अध्यक्ष व आमदार हरिभाऊ बागडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २१ संचालक निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने तसेच एका गटात एकही अर्ज न आल्याने १८ संचालक निवडीसाठी रविवारी (ता.२१) मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. शेतकरी विकास पॅनेल व शेतकरी सहकार विकास पॅनेल, या दोन गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्हा बॅंक निवडणूक प्रचाराचा फड चांगलाच गाजला  होता. १११४ मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार होते. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ दरम्यान जिल्ह्यातील सर्व १० केंद्रांवरून १०४६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला होता.

जवळपास ९४ टक्‍के मतदान झाल्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. त्यानंतर कोणते पॅनेल व कोण अपक्ष या निवडणुकीच्या रिंगणात बाजी मारणार याकडे लक्ष लागले होते. अखेर या निवडणुकीच्या सोमवारी (ता.२२) लागलेल्या निकालाअंती जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळात शेतकरी विकास पॅनलचे १४ तर शेतकरी सहकारी बॅंक विकास पॅनेलचे ५ सदस्य निवडणूक आले. तर एका अपक्ष सदस्यानेही बाजी मारली. आमदार बागडे यांचा बिगर शेती संस्था मतदारसंघात पराभव झाला. 

निवडणुकीतील मतदारसंघ व  त्यामधील विजयी उमेदवार  प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संस्था औरंगाबाद- खान जावेद शब्‍‌बीर खान पटेल. प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संस्था खुलताबाद- किरण अशोकराव पाटील. प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संस्था फूलंब्री- सुहास त्रिंबकराव सिरसाठ, प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संस्था सिल्लोड- अर्जुनराव बाबुराव गाढे. प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संस्था सोयगाव- सुरेखा प्रभाकर काळे. प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संस्था कन्नड-मनोज महारू राठोड. प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संस्था पैठण- संदीपान आसाराम भुमरे. प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संस्था गंगापूर- कृष्‍‌णा साहेबराव पाटील. प्राथमिक कृषी पतपुरवठा वि. का. सेवा सहकारी संस्था वैजापूर-आप्पासाहेब रामकृष्ण पाटील.

बिगर शेती संस्था--जगन्नाथ वैजीनाथराव काळे, सतीष भानुदासराव चव्हाण, अभिषेक जगदीश जैस्वाल, अंबादास एकनाथराव दानवे, नितिन सुरेश पाटील. कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया संस्था- सत्तार अ. नबी. अनु. जाती/ जमाती सदस्य- डॉ. सतीश दशरथ गायकवाड. इतर मागासवर्गीय सदस्य-देवयानी कृष्‍‌णा पाटील. विमुक्‍त जाती/ भटक्‍या जमाती/ किंवा विशेष मागास प्रवर्ग सदस्य-दिनेशसिंह पद्मसिंह परदेशी. महिला सदस्य-पार्वताबाई रामहरी जाधव, मंदाबाई अण्‍‌णासाहेब माने.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com