औरंगाबाद जिल्ह्यात धुक्‍याची चादर पिकांच्या मुळावर

शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी पक्षी थांब्यांचा एकरी १० ते १२ वापर करावा. प्रादुर्भाव जास्त असल्यास आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर निंबोळी अर्क १० हजार पीपीएम १० मिली प्रति दहा लिटर पाणी वापरून फवारणी घ्यावी. - डॉ. किशोर झाडे, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, औरंगाबाद. फळबागांमध्ये उष्णता निर्माण होण्यासाठी रात्रीच्या वेळी बागेत ओलसर काडीकचरा जाळून धूर करावा. तसेच शक्‍य झाल्यास रात्रीच्या वेळेस बागेला पाणी द्यावे. - डॉ. संजय पाटील, प्रमुख, मोसंबी संशोधन केंद्र, जालना. दाट धुक्‍यामुळे ज्वारी, कांदा पिकाला मोठा फटका बसतो आहे. नेटकेच लागवड केलेल्या कांद्याचे रोपटे जळून जात आहेत. याचा थेट परिणाम कांदे पातळ होऊन उत्पादनावर होईल. ज्वारी पिकावरही तेल्या चा प्रादुर्भाव होण्याची भीती असून कणसात दाने भरण्याचे प्रमाण कमी होईल. - राजू कासम शेख, शेतकरी, महमदपूर, देवळी, जि. औरंगाबाद.
 In Aurangabad district, the fog sheet is at the root of the crop
In Aurangabad district, the fog sheet is at the root of the crop

औरंगाबाद : ढगांची गर्दी, त्यात बोचरी थंडी व धुक्‍याची चादर भाजीपाला व फळपिकांच्या मुळावर उठली आहे. धुक्‍यामुळे खासकरून भाजीपाला पिकांवर करप्याच्या प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली असून गहू, हरभऱ्यावर उंट अळीचाही प्रादुर्भावाची भीती आहे. फळपिकांमध्ये प्रकाश संश्‍लेशनाच्या प्रक्रियेत अडथळा, तर मोसंबी, आंबा, पपई या पिकांच्या वाढीवर परिणामाची भीती तज्ञांनी व्यक्‍त केली आहे. 

खरिपाच्या पिकांचे अवेळी व सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बी पिकांसह, फळपिक व भाजीपाल्यावर अवलंबून आहेत. परंतु, या तिन्ही प्रकारातील पिकांना फारसे काही पोषक वातावरण सद्यातरी दिसत नाही. थंडी, ऊन, आकाशात ढगांची गर्दी, कुठे रिमझिम, बऱ्यापैकी पाऊस, तर मधेच धुक्‍याची चादर, यामुळे पिकांना पोषक स्थिती यंदा मिळेल की नाही हा प्रश्‍न आहे. 

कांदा, टोमॅटो, वांगी, पालेभाज्यांवर करप्याचा प्रादुर्भाव झाला असून तो वाढण्याची शक्‍यता आहे. धुक्‍यामुळे गव्हावरही मावा, उंट अळी व करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. तो ही वाढेल. 

हरभऱ्यावर उंट अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे सध्या असलेल्या प्रतिकूल वातावरणामुळे फळझाडांच्या पेशींना इजा होऊन, त्या मरण पावण्याची, झाडांच्या फांद्या, पाने वाळण्याची भीती आहे, असा अंदाज कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. 

पालेभाज्यांच्या नुकसानीचा अंदाज

झाडात अन्ननिर्मिती प्रक्रिया ठप्प होऊन वनस्पतीमध्ये शारीरिक बिघाड होऊन, प्रकाश संश्‍लेशनात अडथळा निर्माण होतो. मोसंबी पपई, आंबा या पिकाच्या वाढीवरही विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. कांदा, टोमॅटो, वांगी, पालेभाज्यांवरील करपाच्या नियंत्रणासाठी कार्बेनडॅझिम २० ग्रॅम किवा मॅनकोझेब २० ग्र्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात फवारणी करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com