agriculture news in marathi In Aurangabad district, guaranteed sorghum and maize are left untouched | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी, मक्‍याचे चुकारे बाकी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र सुरू करून हरभरा, रब्बी ज्वारी, मक्याची खरेदी करण्यात आली. परंतु त्याचे चुकारे शेतकऱ्यांना अजून मिळणे बाकी आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र सुरू करून हरभरा, रब्बी ज्वारी, मक्याची खरेदी करण्यात आली. परंतु त्याचे चुकारे शेतकऱ्यांना अजून मिळणे बाकी आहेत. नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक गरज आहे. त्यामुळे त्वरित चुकारे द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.  
औरंगाबाद जिल्ह्यात ५१०० रुपये प्रतिक्‍विंटल हमीभावाने हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी ७ केंद्रे सुरू करण्यात आली. त्यामध्ये गंगापूर, औरंगाबाद, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव व फुलंब्री येथील केंद्राचा समावेश होता. यापैकी केवळ औरंगाबाद, खुलताबाद व गंगापूर या तीन केंद्रावरच शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीला प्रतिसाद दिला.

१४९ शेतकऱ्यांकडील ११३८ क्‍विंटल ५० किलो हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापैकी १४६ शेतकऱ्यांच्या ११३८ क्‍विंटल हरभऱ्याचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. तर उर्वरित हरभऱ्याचे चुकारे शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहेत. ज्वारी खरेदीसाठी फुलंब्री, गंगापूर, कन्नड, करमाड, खुलताबाद, लासूर, सिल्लोड, सोयगाव व वैजापूर या केंद्राचा समावेश होता. 

९०४ क्‍विंटल मक्याचे चुकारे बाकी 

मका खरेदीसाठी ज्वारीसाठीच्याच ९ केंद्रांवर खरेदीची प्रक्रिया राबविली. त्यापैकी सिल्लोड वगळता ८ केंद्रांवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीला प्रतिसाद दिला. २४९५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. १६५ शेतकऱ्यांकडील ४०६० क्‍विंटल मका खरेदी करण्यात आली. त्यापैकी १३२ शेतकऱ्यांच्या ३१५० क्‍विंटल ५० किलो मक्याचे चुकारे शेतकऱ्यांना दिले. जवळपास ९०४ क्‍विंटल मक्याचे चुकारे येणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...