औरंगाबाद जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आला निम्मा युरिया

कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांवर अशा रांगा लावण्याची वेळ आली आहे. खत खरेदी कशी करावी, हा प्रश्‍न आहे. खताची गरज भागवावी. - सर्जेराव मुठाळ, शेतकरी,निपाणी, जि. औरंगाबाद
In Aurangabad district, half of the urea was compared to the demand
In Aurangabad district, half of the urea was compared to the demand

चिते पिंपळगाव, जि. औरंगाबाद : येथील कृषी सेवा केंद्रावर मंगळवारी (ता. ७) युरियाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. आवश्यकता असूनही अपेक्षेप्रमाणे युरिया मिळत नसल्याची बाब रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. युरियासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याची बाब समोर आल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने युरियाचा पुरवठा करण्यात आला, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.

यंदाच्या खरीप हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यासाठी १ लाख १ हजार ४६० मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन मंजूर करण्यात आले. त्याच्या तुलनेत ५१ हजार मेट्रिक टन युरिया आतापर्यंत जिल्ह्याला मिळाला आहे. तर, प्रत्यक्षात गतवर्षीचा शिल्लक युरिया मिळून जवळपास ६८ हजार ३४८ मेट्रिक टन युरियाची आतापर्यंत जिल्ह्यात विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

एप्रिल-मे महिन्यात पुरवठासाखळी नुसार २९ हजार मेट्रिक टन युरिया जिल्ह्याला मिळणे अपेक्षित होते. मात्र, ३१ हजार मेट्रिक टन युरिया जिल्ह्यात पुरवठा झाला. जून महिन्याच्या पुरवठ्यानुसार २२ हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा होणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात १७ हजार मेट्रिक टन युरियाच मिळाला. त्यामुळे जवळपास पाच हजार मेट्रिक टन युरियाची तुट आली.

जुलै महिन्याच्या मंजूर पुरवठ्यानुसार आतापर्यंत सहा हजार ७०० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झाला आहे. आणखी तीन रेक येत्या आठवडाभरात जिल्ह्यात प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली. प्रतिक्रिया...

आठवड्यापासून युरिया खतासाठी रांगेत उभा राहतो आहे. नंबर आला की खत संपते. आजही खत मिळेल का नाही माहित नाही. - अनिल चौधरी, शेतकरी, गारखेड, जि. औरंगाबाद 

पिकांच्या पोषणासाठी संतुलित खतांचा वापर होण्यासाठी संयुक्त खतांद्वारे पिकांचे पोषण करावे. आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने खताचा मुबलक पुरवठा होत आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे.  - आनंद गंजेवार, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com