औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची वाट अवघडच

शिवारात आता दिवसा सिंचनासाठी आवश्‍यक वीजपुरवठा असतो. त्या पुरवठ्याची वेळ सुरू होऊन अडीच तास झाले. बाऱ्यावर बसून आहे, वीजपुरवठाच नाही. हरभरा, उन्हाळी बाजरी, मका, डाळिंबाची पिके आहेत, पण पाण्याच्या व्यवस्थापनात वीजही कायम खोडा घालते. - दिनकर गिते, शेतकरी, देवगाव ता. पैठण डाळिंब, काकडी, सिमला मिरची, भाजीपाला पिकासाठी प्रत्येक दिवशी पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. रात्री जंगली प्राण्यांची, अपघाताची भीती पाहता सिंचनासाठी वीज दिवसाच मिळावी. अनेकदा होणाऱ्या बिघाडाने पाण्याबरोबरच खत व्यवस्थापनातही खोडा घातला जातोय. - भरत अहेर, शेतकरी, टोणगाव ता. जि. औरंगाबाद
In Aurangabad district, irrigation is difficult due to electricity
In Aurangabad district, irrigation is difficult due to electricity

औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा वीजपुरवठा करण्याच्या तंत्रामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनांची वाट अवघडच बनली आहे. रात्री वा दिवसा वीजपुरवठ्यात बिघाड झाला, तर पडणारा खंड, रात्रीच्या वेळी पाणी देण्यातील संकटाचे प्रकार पाहता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्‍य नाही का? असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत.  

जिल्ह्यासह बहुतांaश भागात शेतीसिंचनासाठी वीजपुरवठ्यासाठी महिन्यातील दोन आठवडे रात्री, तर दोन आठवडे दिवसा वीजपुरवठ्याचे तंत्र अवलंबण्यात आले आहे. रात्रीचा वीजपुरवठा असल्यास या तंत्रात बिघाडाचा अडथळा आला, तर दिवस निघाल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती होऊन पुन्हा रात्री वीजपुरवठा सुरळीत होण्यापर्यंत वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. 

भाजीपालावर्गीय व काही संरक्षित पिकांमध्ये शेतकऱ्यांचे दर दिवसाचे पाण्याचे ठरावीक नियोजन असते. त्यासह खताच्या व्यवस्थापनाही मोठा खोडा घालण्याचे काम हा खंडीत वीजपुरवठा करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्वांचा परिणाम दरवर्षी २५ ते ३० टक्‍क्‍याने उत्पादन घटत आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. याशिवाय जंगली प्राणी, साप, विंचू आदींच्या आक्रमणाचा धोका पत्करूनच शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी देण्याची वेळ येत आहे. 

कृषिप्रधान देशात कृषीसाठी दिवसा वीजपुरवठा करणे शक्‍य नाही का? असा सवाल देवगाव येथील शेतकरी सदाशिव गिते यांनी विचारला. काही शेतकऱ्यांनी हा प्रश्‍न थेट कृषीमंत्री दादा भुसे यांच्यापर्यंत पोहचविला आहे. आता याप्रकरणी तत्काळ पावले उचलून शेतकऱ्यांना दिवसा तोही किमान दहा तास सलग वीजपुरवठा करण्याची सोय शासनाने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com