Agriculture news in marathi In Aurangabad district, irrigation is difficult due to electricity | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची वाट अवघडच

टीम अॅग्रोवन
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

शिवारात आता दिवसा सिंचनासाठी आवश्‍यक वीजपुरवठा असतो. त्या पुरवठ्याची वेळ सुरू होऊन अडीच तास झाले. बाऱ्यावर बसून आहे, वीजपुरवठाच नाही. हरभरा, उन्हाळी बाजरी, मका, डाळिंबाची पिके आहेत, पण पाण्याच्या व्यवस्थापनात वीजही कायम खोडा घालते.
- दिनकर गिते, शेतकरी, देवगाव ता. पैठण

डाळिंब, काकडी, सिमला मिरची, भाजीपाला पिकासाठी प्रत्येक दिवशी पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. रात्री जंगली प्राण्यांची, अपघाताची भीती पाहता सिंचनासाठी वीज दिवसाच मिळावी. अनेकदा होणाऱ्या बिघाडाने पाण्याबरोबरच खत व्यवस्थापनातही खोडा घातला जातोय.
- भरत अहेर, शेतकरी, टोणगाव ता. जि. औरंगाबाद

औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा वीजपुरवठा करण्याच्या तंत्रामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनांची वाट अवघडच बनली आहे. रात्री वा दिवसा वीजपुरवठ्यात बिघाड झाला, तर पडणारा खंड, रात्रीच्या वेळी पाणी देण्यातील संकटाचे प्रकार पाहता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्‍य नाही का? असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत.  

जिल्ह्यासह बहुतांaश भागात शेतीसिंचनासाठी वीजपुरवठ्यासाठी महिन्यातील दोन आठवडे रात्री, तर दोन आठवडे दिवसा वीजपुरवठ्याचे तंत्र अवलंबण्यात आले आहे. रात्रीचा वीजपुरवठा असल्यास या तंत्रात बिघाडाचा अडथळा आला, तर दिवस निघाल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती होऊन पुन्हा रात्री वीजपुरवठा सुरळीत होण्यापर्यंत वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. 

भाजीपालावर्गीय व काही संरक्षित पिकांमध्ये शेतकऱ्यांचे दर दिवसाचे पाण्याचे ठरावीक नियोजन असते. त्यासह खताच्या व्यवस्थापनाही मोठा खोडा घालण्याचे काम हा खंडीत वीजपुरवठा करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्वांचा परिणाम दरवर्षी २५ ते ३० टक्‍क्‍याने उत्पादन घटत आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. याशिवाय जंगली प्राणी, साप, विंचू आदींच्या आक्रमणाचा धोका पत्करूनच शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी देण्याची वेळ येत आहे. 

कृषिप्रधान देशात कृषीसाठी दिवसा वीजपुरवठा करणे शक्‍य नाही का? असा सवाल देवगाव येथील शेतकरी सदाशिव गिते यांनी विचारला. काही शेतकऱ्यांनी हा प्रश्‍न थेट कृषीमंत्री दादा भुसे यांच्यापर्यंत पोहचविला आहे. आता याप्रकरणी तत्काळ पावले उचलून शेतकऱ्यांना दिवसा तोही किमान दहा तास सलग वीजपुरवठा करण्याची सोय शासनाने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

 


इतर बातम्या
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...