agriculture news in marathi In Aurangabad district, kharif sowing is proposed on 6. 81 lakh hectares | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात पावणेसात लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

औरंगाबाद : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात ६ लाख ८१ हजार ६६४ हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र सहा लाख ७५ हजार हेक्टर इतके आहे.

औरंगाबाद : येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात ६ लाख ८१ हजार ६६४ हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र सहा लाख ७५ हजार हेक्टर इतके आहे.

एकूण क्षेत्रात कपाशी व मका पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक राहणे अपेक्षित आहे. कपाशीचे क्षेत्र साधारणतः ३ लाख ९९ हजार ९६५ हेक्टर, तर मक्याची पेरणी १ लाख ५५ हजार हेक्टरवर होणे अपेक्षित आहे. बाजारभाव कमी असल्याने मक्याच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट होऊन तुर व सोयाबीनचे क्षेत्र वाढणे अपेक्षित आहे. तुरीचे क्षेत्र साधारण ४२ हजार २०० हेक्‍टरवर, तर सोयाबीनचे क्षेत्र २० हजार १०० हेक्टरवर नियोजित आहे. 

एकूण क्षेत्रासाठी ४३ हजार ३१६ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. ४१ हजार १६६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. महाबीज व राष्ट्रीय बीज निगमकडून अनुक्रमे २१८७ क्विंटल व ८८६ क्विंटल बियाणे, तर खासगी कंपनीकडून ४० हजार ३१३ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. सोयाबीनचे क्षेत्र वाढल्यास ते वगळता सर्व पिकाच्या बियाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात राहील. संभाव्य वाढ लक्षात घेऊन घरचे सोयाबीन बियाणे वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती 
करण्यात आली. 

शेतकऱ्यांनी ७२१२ क्‍विंटल बियाणे लागवडीसाठी राखून ठेवले आहे. तर उन्हाळी बिजोत्पादनातून १४०० क्विंटल बियाणे मिळेल. त्यामुळे ८६१२ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडून मिळेल. सार्वजनिक व खासगी कंपन्यांमार्फत ४३१० क्विंटल बियाणे मिळेल.

प्रस्तावित क्षेत्रासाठी हे बियाणे पुरेसे आहे. प्रत्येक विक्री केंद्रात आलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता संबंधित विक्रेत्यांनी तपासणे व त्यानुसार विकणे बंधनकारक राहील. यावर कृषी सहायकांमार्फत सनियंत्रण ठेवण्यात येईल. प्रत्येक प्लॉटचा नमुना जपून ठेवणे व प्राप्त होणाऱ्या साठ्याची कृषी विभागाला माहिती देणे बंधनकारक आहे.

२ लाख ५५ हजार टन आवंटन मंजूर 

जिल्ह्यात मागील हंगामात सरासरी खतांचा वापर २ लाख ६८ हजार ८८९ टन होता. यंदासाठी २ लाख ५५ हजार ८१० टन एवढे आवंटन मंजूर आहे. १ एप्रिल २०१९ रोजी १ लाख १८ हजार १७६ टन खताचा सुरुवातीचा साठा उपलब्ध होता. एप्रिल महिन्यामध्ये २४ हजार २९१ टन खताचा पुरवठा होऊन एप्रिलअखेर १ लाख ४२ हजार ४६७ खताचा साठा मिळाला. युरिया खताचा ५० हजार ११२ टन, तर संयुक्त खतांचा ६३२९४ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. खते मुबलक असतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.


इतर बातम्या
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...