औरंगाबाद जिल्ह्यात तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीला प्रतिसादच मिळेना

औरंगाबाद : जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या ७ केंद्रांवर शेतकरी ऑनलाइन नोंदणीला प्रतिसादच नसल्याची स्थिती आहे.
In Aurangabad district, there was no response to online registration for the purchase of tires
In Aurangabad district, there was no response to online registration for the purchase of tires

औरंगाबाद : जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या ७ केंद्रांवर शेतकरी ऑनलाइन नोंदणीला प्रतिसादच नसल्याची स्थिती आहे. सातपैकी केवळ तीन केंद्रांवरच १५८ शेतकऱ्यांनी आतापर्यंत तुरीच्या हमी दराने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली.

मूग, उडीद, सोयाबीन, मका नंतर आता तुरीच्या हमी दराने खरेदीसाठी जिल्ह्यात सात केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये गंगापूर,औरंगाबाद, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, फुलंब्री या सात केंद्रांचा समावेश आहे. या सातही केंद्रांवरून तुरीच्या हमीदा दराने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी २८ डिसेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. परंतु या नोंदणीला केवळ गंगापूर, औरंगाबाद व खुलताबाद या तीन केंद्रावरच थोडाबहुत प्रतिसाद मिळाला आहे. 

नोंदणीनुसार गंगापूर केंद्रावर १२३, औरंगाबाद २१ व खुलताबाद केंद्रावर १४ शेतकऱ्यांनी आपल्या तुरीची हमी दराने खरेदी व्हावी म्हणून ऑनलाइन नोंदणी केली आहे. शासनाच्या निर्धारित नियमानुसार १२ टक्के आर्द्रता व स्वच्छ प्रतीच्या तुरीला  प्रतिक्विंटल सहा हजार रुपये हमी दराने खरेदी केली जाणार आहे.

बाजारात तुरीला जवळपास ५८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे तूर्त शासनाच्या हमी दराने खरेदीसाठी नोंदणीला शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com