Agriculture news in marathi, In Aurangabad district, tomato storage in crisis due to rain | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे आगार संकटात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पाण्याचे संकट पाहता गतवर्षी एका एकरात दीड हजार कॅरेट टोमॅटो उत्पादन झाले. ते यंदा हजार कॅरेट होईल का नाही, हा प्रश्‍न‌ आहे. आजही शेतकरी टॅकरने पाणी घालून टोमॅटोचे पीक वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. 
- संदीप गवळी, टोमॅटो उत्पादक, माळीवडगाव, जि. औरंगाबाद. 

पुरेसे पाणी नसल्याने विक्रीला येणाऱ्या टोमॅटोचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे दरही कमी झालेत. पावसाची कृपा झाली तरच टोमॅटोचे उत्पादन शक्‍य होईल, अन्यथा काही खरे नाही. 
- इलियास बेग,  टोमॅटो उत्पादक, वरूडकाजी, जि. औरंगाबाद.

औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार संकटात सापडले आहे. पावसाची अत्यल्प हजेरी व आता आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा आगारातील टोमॅटो उत्पादकांसमोर संकट उभे केले आहे. पाण्याच्या ताणामुळे टोमॅटोच्या दर्जावर परिणाम झाला आहे. डाग व करप्याचे संकट उत्पादन खर्चात वाढ करून गेल्याची स्थिती आहे. 

जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, कन्नड तालुक्यांत जवळपास १२०० ते १५०० हेक्‍टर टोमॅटोचे क्षेत्र आहे. गंगापूर तालुक्‍यातील माळीवडगाव, ताडपींपळगाव, तासगाव, गवळी शिवरा, सावंगी, देवगाव, वडाची वाडी, फतीयाबाद, माळीवाडासह कन्नड आदी ठिकाणी टोमॅटोची खरेदी केली जाते. गंगापूर तालुक्‍यातील गाजगाव शिवारातच जवळपास शंभर हेक्‍टरवर टोमॅटोची लागवड झाली आहे. शिवाय औरंगाबाद तालुक्‍यातील वरूडकाजी, सुलतानपूर, हिरापूर, कच्ची घाटी, रामपूर, गंगापूर, बनगाव, गेवराई कुबेर, वरझडी, वडखा आदी गावशिवारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. 

शेततळे असलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीला प्राधान्य दिले. त्यातील पाण्यावर नियोजनपूर्वक टोमॅटोचे जतन केले. पाऊस येईल ही आशा होती. परंतु, लांबलेल्या व सर्वव्यापी न पडणाऱ्या, अत्यल्पच हजेरी लावणाऱ्या पावसाने टोमॅटोचे नुकसान केले. आजही अनेक टोमॅटो उत्पादक टॅंकरने विकत पाणी घेऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जलस्रोतांनाही पाणी आलेले नाही. त्यामुळे आता पाऊस लांबल्यास टोमॅटोच्या उत्पादनात मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या टोमॅटोची खरेदी सुरू झाली आहे. २० जूननंतर लागवड केलेल्या टोमॅटोची आवक होण्याला मात्र अजून किमान पंधरवड्याचा अवधी लागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. १५ ऑगस्टपासून गंगापूर तालुक्‍यात विविध ठिकाणी, औरंगाबाद तालुक्‍यातील वरूडकाजी येथे टोमॅटो खरेदीला सुरवात झाली आहे. पहिल्या दिवशी चारशे ते साडेचारशे रुपये कॅरेटचे मिळणारे दर आता २०० ते २८० रुपये प्रतिकॅरेटवर आले आहेत. वातावरणही पोषक नसल्याने करपा व डागांमुळे टोमॅटोचे दर घसरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टोमॅटोची आवक गतवर्षी याचवेळच्या खरेदीचा विचार करता निम्म्यापेक्षाही कमी झाली आहे. दरवर्षी १५ ऑगस्टपूर्वी जिल्ह्यातील टोमॅटोच्या आगारात तळ ठोकून बसणारे विविध राज्यातील व्यापारीही यंदा फिरकले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वरूडकाजी परिसरात लोकल व्यक्‍तींकडूनच खरेदी सुरू आहे. 

इतर बातम्या
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
चांद्रयान मोहिमेसाठी निधी देणार ः...आटपाडी ः भारतीय अवकाश संशोधन संस्थेला या पुढच्या...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...