agriculture news in marathi In Aurangabad district Works of 1257 wells | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात १२५७ विहिरींची कामे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 मार्च 2021

औरंगाबाद : जिल्ह्यात २०१७-१८ पासून राबविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी  क्रांती योजनेतून १२५७ विहिरींची कामे झाली आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात २०१७-१८ पासून राबविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी  क्रांती योजनेतून १२५७ विहिरींची कामे झाली आहेत. वीज जोडणीअभावी सिंचन करू न शकणाऱ्या लाभार्थ्यांपैकी ७४९ लाभार्थ्यांना कोटेशन निर्गमित करण्यात आले. २५८ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वीज जोडणी मिळाली, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली. 

औरंगाबाद जिल्ह्यात २०१७-१८ पासून या दोन योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमधून ठिबक सिंचन, तुषार संचाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यास पुन्हा सुरवात झाली आहे.

२०१७-१८ पासून दोन्ही योजनेच्या माध्यमातून जवळपास १२५७ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु वीज जोडणी अभावी शेतकऱ्यांना पंप संच, ठिबक संच, तुषार सिंचनाचा लाभ घेता आला नाही. 
यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्‌दा उपस्थित केला. त्यानंतर वीज वितरण कंपनीकडून ७४९ लाभार्थ्यांना कोटेशन दिले गेले. त्यापैकी २५८ शेतकऱ्यांना वीज जोडणीही मिळाली.

विद्युत पंप संच, ठिबक व तुषार संच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१७-१८ ते २०१९-२० मधील लाभार्थ्यांची तत्काळ एमएसईबी दिलेल्या कोटेशनची रक्कम भरून वीज जोडणी शुल्काची मागणी पंचायत समितीकडे सादर करावी. वीज जोडणी शुल्क संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यांवर अदा करण्यात येईल.

लाभार्थ्यांस विद्युत पंप संच खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे. पंपसंच खरेदी करून अनुदानाची मागणी ३१ मार्च २०२१ अखेरपर्यंत करावे, असे आवाहन करण्यात आले. २०१७-१८ पासून २०१९-२० विहिरी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना ठिबक व तुषार संचासाठी अर्ज स्वीकारण्यास महाडीबीटी पोर्टलवर सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांनी कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करावे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ठिबक तुषार संचासाठी ९० टक्‍के अनुदान मिळेल. 

‘महाडीबीटीवर अर्ज करा’ 

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून ५५ टक्‍के अनुदान मिळेल. ३५ टक्‍के अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून मिळेल. दोन्ही योजनेतून लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचासाठी ९० टक्‍के अनुदान मिळेल. त्यापैकी ५५ टक्‍के अनुदान पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत ‘प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेतून  तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे दिले जाते. उर्वरित ३५ टक्‍के अनुदान हे कृषी विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद कार्यालयाकडून देण्यात येईल. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची सूचना गायकवाड यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...