Agriculture news in marathi In Aurangabad, farmers sell vegetables and fruits worth 1.25 crore | Agrowon

औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांतर्फे महिन्यात सव्वा कोटीच्या भाजीपाला,फळांची विक्री

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 एप्रिल 2020

औरंगाबाद : शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतंर्गत शेतकऱ्यांनी ३१ दिवसांत औरंगाबाद शहरात सव्वा कोटी रुपयांच्या फळे-भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री केली. 

औरंगाबाद : शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रमांतंर्गत शेतकऱ्यांनी ३१ दिवसांत औरंगाबाद शहरात सव्वा कोटी रुपयांच्या फळे-भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री केली. 

औरंगाबाद शहरात कृषी विभाग, आत्मा, जिल्हा प्रशासन, शेतकरी व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या समन्वयातून शेतकरी ते ग्राहक थेट फळे भाजीपाला विक्री उपक्रम २९ मार्चला सुरू करण्यात आला. सुमारे २१ शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहभागातून हा उपक्रम सुरू झाला. त्यात ६६ शेतकरी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी आहेत. यामध्ये ६ शेतकरी कंपन्या १२ शेतकरी व जवळपास ४८ शेतकरी गटांचा समावेश आहे. 

या दरम्यान, एका दिवशी १० लाख रुपयांच्या पुढे फळे, भाजीपाला विक्रीचा उच्चांक शेतकऱ्यांनी गाठला. सुरुवातीला दिवसात २ लाख रुपयापर्यंत उलाढाल झाला. आता ती साडेतीन ते चार लाखाच्या पुढे होते आहे. २८ एप्रिलला शेतकऱ्यांनी ७१६० किलो भाजीपाला व १० हजार ६७० किलो फळांची थेट ग्राहकांना विक्री करून ४ लाख ७८ हजार ६०० रुपयांची कमाई केली. सुरुवातीपासून २८ एप्रिलपर्यंत तब्बल १ लाख ८४ हजार ४६३ किलो भाजीपाला, तर २ लाख ९९ हजार ७६३ किलो फळांची विक्री केली. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन दरम्यान हा उपक्रम ग्राहक, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. नियमांचे पालन करून शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या थेट विक्रीसाठीचे भविष्यातील संधीचे जाळे अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...