औरंगाबादमध्ये द्राक्षे २२०० ते ४७०० रुपये प्रतिक्‍विंटल

In Aurangabad, grapes are available 2200 to 4700 rupees per quintal
In Aurangabad, grapes are available 2200 to 4700 rupees per quintal

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.७) द्राक्षांची १८० क्‍विंटल आवक झाली. त्यांना किमान २२०० ते कमाल ४७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी खरबुजाची आवक १३० क्‍विंटल झाली. त्यांना किमान १००० ते कमाल १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ क्‍विंटल आवक झालेल्या बोरांचे दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३० क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्यांचा दर ७०० ते १९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २५ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबांना २००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४० क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर ५०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १६ क्‍विंटल आवक झालेल्या कैरीचा दर ३००० ते ३५०० रुपये  प्रतिक्‍विंटल राहिला.  

७९ क्‍विंटल आवक झालेल्या भुईमूग शेंगांना १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.हिरव्या मिरचीची आवक ११० क्‍विंटल झाली. दर किमान २००० ते कमाल ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८१० क्‍विंटल आवक झालेल्या कांद्यांचा दर ३०० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला २०० ते ३०० रुपये दर मिळाला. १४१ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर २०० ते ५०० रुपये राहिले. 

वांग्यांची आवक ४२ क्‍विंटल झाली. त्यांना ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. गवारीची आवक ५ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३१ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.  भेंडीला २३ क्‍विंटल आवक झाली. तर, दर किमान १००० ते कमाल २३०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. ११३ क्‍विंटल आवक झालेल्या कोबीचे दर ३०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. लिंबांची आवक ३२ क्‍विंटल, तर दर १४०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला

शेवगा २५०० ते  ४००० रुपये क्विंटल 

शेवग्याची आवक २० क्‍विंटल झाली. त्यांना किमान २५०० ते कमाल ४००० रुपये प्रतिक्‍विंटल दर राहिला. १२ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक २५ क्‍विंटल, तर दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com