औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची ८५ क्विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
In Aurangabad, green chillies rate 1800 to 2000 per quintal
In Aurangabad, green chillies rate 1800 to 2000 per quintal

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची ८५ क्विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्यांची ४५३ क्‍विंटल आवक झाली. त्यांना २०० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ६५ क्विंटल, तर दर १००० ते २००० रुपये प्रति क्विंटल राहिले. टोमॅटोची आवक ६७ क्विंटल झाली. त्यांना ५०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. वांग्यांची आवक १४ क्विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या गवारीला २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. 

काकडीची आवक ४२ क्विंटल दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३५ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला १००० ते १८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. कोबीची आवक ११२ क्विंटल, तर दर ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल राहिला. ४५ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक ११ हजार जुड्या झाली. तिला ३०० ते ५०० रुपये प्रति शेकडा दर मिळाला. २५ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला १६०० ते २००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. 

आंब्यांची आवक १८९ क्विंटल, तर दर ३००० ते ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ७ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ६०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक २० क्विंटल, तर दर १४०० ते २००० रुपये प्रति क्‍विंटल दर राहिले. ६१ क्विंटल आवक झालेल्या कैरीला १५०० ते २२०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. कारल्याची आवक १५ क्विंटल, तर दर १००० ते १३०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या दिलपसंदला ६०० ते ८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.  मोसंबीला ३०० ते ९०० रूपये दर 

मोसंबीची आवक ५५ क्विंटल, तर दर ३०० ते ९०० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या चिकूचे दर १००० ते १८०० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. ८५ क्विंटल आवक झालेल्या लसूणचे दर ३५०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल राहिले. बटाट्याची आवक ५०० क्विंटल, तर दर ५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. भुईमूग शेंगांची आवक ५२ क्विंटल दर दर ३००० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com